Sunday , February 9 2025
Breaking News

ढगाळ हवामानामुळे सौंदलगा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

Spread the love

 

 

सौंदलगा : सौंदलगा व परिसरात एक नगदी पीक म्हणून कांदा पिक शेतकरी घेत असतात सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात कांदा या पिकाची लागण केली जाते. साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कांदा पिकाची लागवड केली जाते. कांद्यास थंडीतील वातावरण अनुकूल असते त्यामुळे थंड वातावरण साधारणपणे कांदा हे पीक चांगले येते एक आर्थिक फायदा मिळवून देणारे नगदी पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पहात असतो मागील दोन वर्षापासून कांदा या पिकावर पिळक्या या रोगाचा प्रादुर्भाव होता त्यामुळे यावर्षी लावणी थोड्या उशिरा झाल्या पण आता जानेवारी महिन्यात कांदा पीक जोमात असताना हवामानातील बदलाचा कांदा पिकावर परिणाम दिसू लागला आहे. ढगाळ हवामान व कमी झालेले थंडी यामुळे कांदा पिकावर करपा व मावा या रोगांचा पादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. वाढलेले बियाण्यांचे दर तसेच महाग झालेले तरु वाढलेले लागवडीचे व औषधाचे दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना चांगले आलेले कांदा पिक ते हवामानामुळे धोक्यात येते की काय अशी चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे. यासाठी आता योग्य ती औषध फवारणी करून पीक चांगले घेण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत असला तरी वाढत्या औषधाच्या किमती, वाढलेले रासायनिक खताचे दर यामुळे शेतकरी वर्ग आधीच आर्थिक संकटात असून या वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगाने अधिकच चिंतेत दिसत आहे. कांदा बाजारपेठेत जाई तोपर्यंत काय होईल हे सांगता येत नसल्याने इतका सगळा खर्च करून शेतकऱ्यांच्या हातात काय राहणार याची चिंता शेतकऱ्याला आहे. कारण कांद्याला हमीभाव नसल्याने कांदादराची शाश्वती देता येत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी कांद्याच्या हमीभावासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी सर्व शेतकरी वर्गाची मागणी असून, या भागातील सर्व शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करावा तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल.

————————————————————

प्रतिक्रिया

विनायक केसरे किसान शेती सेवा केंद्र यांनी सांगितले की, सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे कांदा या पिकावर करपा व मावा याचा प्रादुर्भाव दिसून येत असून यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ते औषधांची वेळीच फवारणी घेऊन हा रोग आटोक्यात आणावा. तसेच योग्य ती काळजी घेऊन या रोगावर नियंत्रण ठेवता येते असे त्यांनी सांगितले.

रामा रणदिवे -कांदा उत्पादक शेतकरी यांनी सांगितले की, कांद्यावर पडणाऱ्या या रोगामुळे कांदा पीक पिवळे दिसत असून, माव्यामुळे कांद्याच्या पातीतील रस शोषला जातो त्यामुळे कांदा पिकाच्या वाडीवर प्रतिकूल परिणाम होतो, उत्पादन घटण्याची शक्यता आहे यासाठी औषध फवारणी करणे गरजेचे असून, कांदा या पिकास हमीभाव मिळावा असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *