Wednesday , July 9 2025
Breaking News

ज्वारीच्या पिकं व झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी; 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी

Spread the love

 

निपाणी : निपाणी समाधीमठ रोड सुतार ओढा शेजारी असणारी मधुसूदन (राजन) शंकरराव चिकोडे यांच्या पिकाऊ शेत जमीन मधील कापुन ठेवलेली ज्वारी व कडबा यास आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे जवळपास 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी शेतकरी रयत यांची झाली आहे. या परिसरात गुंठेवारी प्लाॅट विक्री सुरू आहे. परिणामी लोक वस्ती वाढत आहे. रिकाम्या टेकड्या व्यसनाधीन युवक या ओढ्याचे कडेला असलेल्या झाडाखाली मद्यपान, धुम्रपान, त्याच बरोबर पत्ते जुगार खेळत असतात. आणि हेच तरूण दारूच्या नशेत काडी पेटवून शेत पिकात टाकतात. मागील वर्षी ही याच कारणामुळे शेतातील घराला आग लागल्यामुळे लाखोच्या आर्थिक नुकसान झाले होते. या भागातील छुपा जुगार अड्डा बंद करणे साठी पोलीस यंत्रणेने हस्तक्षेप केला पाहिजे अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.
हाता तोंडाशी आलेले पिक आगीच्या भक्षस्थानी पडलेले पाहुन रात्रंदिन कष्ट करणारे रयताना अश्रु अनावर झाले होते. त्याना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत होती.

रयत पुंडलिक माने, बंडा बलगुडे, सुरज माने इत्यादी शेतकरी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण ही आग आटोक्यात न येता ओढ्याकडील झाडे झुडपे, कडबा ज्वारीची कणसे याकडे पेट घेतल्याने निपाणी अग्नीशमन गाडी मागवून घेतली. या फायर फायटर अग्नीशमन दलाचे अधिकारी जकाप्पा कोरवी, बसवरा दोणवाडे, डी.एल. कोरे, एल व्ही.बंजत्री, जे.डी.कमते यांनी मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
व्यसनाधीन युवक या ओढ्याच्या आश्रयाखाली जुगार, दारू पिऊन शेती पिकांचे नुकसान करीत आहेत. तेव्हा शेती नष्ट करून सिमेंट जंगल उभा करून शेती नामशेष होऊ नये या साठी शेती ला संरक्षण मिळावे यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्रातील आरोग्य योजना सीमाभागालाही देणार

Spread the love  कोल्हापुरचे पालकमंत्री आबिटकर; निपाणीस सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : सीमाभागातील नागरिकांच्या समस्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *