तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून बेळगाव येथील हेस्कॉम अधिकारी शशिकांत चिक्काडे यांना मंगळवारी (ता.२१) निवेदन दिले.
ऊस जळालेल्या शेतकऱ्यांमध्ये मानकापूर, जैनवाडी, बेनाडी, यमगरणीसह इतर गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसानी बाबत हुबळी विभागाचे अधिकारी एस. मोमीन यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून ४ जून नंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा होईल, अशी ग्वाही दिली. याशिवाय शेतकऱ्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवण्याची ग्वाही दिली.
रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, निपाणी हेस्कॉम कार्यालयाला दुरुस्ती व इतर कामासाठी असलेले भाडोत्री वाहन बंद करून कार्यालयाला नवीन वाहन देण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन वाहन देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनापा पुजारी, शशिकांत पडसलगी, आलोकनाथ, लोकेश महाराज, रवी सुपनावर, बाबासाहेब पाटील, चीनु कूळवमोडे, कुमार पाटील एकनाथ सादळकर, बबन जामदार, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, संजय पोवार, नितीन कानडे, सागर पाटील, संजय नाईक, उमेश बारवान सर्जेराव हेगडे, सचिन पाटील, एच.बी. ढवणे, किसन नंदी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.