Monday , September 21 2026
Breaking News

शिव, बसव, आंबेडकर जयंतीत डॉल्बीचा दणदणाट बंदच

Spread the love

 

पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर; नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांचे आदेशानुसार सर्वत्र डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्यात आली. सण, समारंभ, विविध जयंतीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या मिरवणुकामध्ये मोठ्या आवाजात डॉल्बी, डीजे लावल्याने त्याचा वृद्ध नागरिक, महिला,व रुग्णावर आघात होत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन शिव, बसव आणि डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या मिरवणुकीत डॉल्बी, डीजे लावल्यावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर कारवाई करण्यासह डॉल्बी अथवा डीजे जप्त करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांनी दिली. येथील शहर पोलीस ठाण्याच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पोलीस उपाधीक्षक गौडर म्हणाले, महान व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमात डॉल्बी, डीजे न लावता समाज प्रबोधन पर कार्यक्रम घ्यावेत. मंडळातील काही तरुणांच्या उत्साहामुळेच डॉल्बी डीजे लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. शिवाय लाखो रुपयांचा खर्चही करावा लागतो. मोठ्या आवाजातील डीजेमुळे हृदयघात आणि कानावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय गर्भवती महिला, अंथरुणाशी पडलेले रुग्ण लहान मुलांच्यावरही डीजे चा परिणाम होतो. याबाबत पोलीस ठाण्यातर्फे शहर आणि ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे जयंत्या साजरी करणाऱ्या मंडळांनी समाजभान लक्षात ठेवून डीजे अथवा डॉल्बी न लावता केवळ दोन बेस लावून मिरवणूक काढावी. याबाबत शहरातील डीजे आणि डॉल्बीधारकांची बैठक घेतली असून जयंतीच्या वेळी त्या न लावण्याचा सूचना केल्या आहेत.
—–
वाहतुकीच्या नियमांचे पालन करा
सध्या सर्वच रस्ते चांगल्या स्वरूपाचे बनले आहेत. सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे. अशावेळी अपघात झाल्यास वाहनचालक व त्यावरील व्यक्ती दगावू शकते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना दिवसाची अथवा चार चाकी चालवण्यास देऊ नये. दुचाकीवारांना हेल्मेट सक्ती तर चार चाकी वाहन चालकांना सिट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरी वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून स्वतःचे कुटुंब सुरक्षित ठेवण्याचे आवाहन गौडर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *