


अध्यक्ष ॲड.संजय वैराट : १५० पेक्षा अधिक वकिलांचे काम बंद आंदोलन
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ५ हजार ५०० दर मिळावा या मागणीसाठी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात विविध शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी, हत्तरगी सह विविध ठिकाणी येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस आंदोलनाला आता कायदेशीर बळ मिळाले आहे. निपाणी वकील संघटनेने (बार असोसिएशन) या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याशिवाय आंदोलन कर्त्यावर केलेल्या खटल्यासाठी मोफत काम करण्यासाठी जाहीर केले आहे. तसेच बुधवारी (ता.१४) न्यायालयाचे कामकाज बंद ठेवले.
माजी खासदार राजू शेट्टी, निपाणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या संयुक्तिमाने सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
१५५ पेक्षा जास्त वकिलांचा प्रत्यक्ष सहभाग आहे.अशातच,आज निपाणी बार असोसिएशनच्या वकिलांनी कोगनोळी येथील आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत वकिलांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत शासनाचा निषेध केला.
शेतकऱ्यांवरील दाखल झालेले खटले मोफत लढणार आहोत.
निपाणी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संजय वैराट यांनी, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर शासन किंवा प्रशासनाकडून ज्या काही कायदेशीर खटले दाखल केले जातील, ते सर्व खटले निपाणी बार असोसिएशनचे वकील न्यायालयात पूर्णपणे मोफत लढणार आहेत.आंदोलनस्थळी येणारे नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी वकील संघटनेतर्फे मोफत जेवणाची केला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी ॲड.एम. ए. सनदी, ॲड. एम. व्ही. कुलकर्णी, ॲड. निलेश हत्ती, ॲड. इमगौडनावर, ॲड. अविनाश कट्टी, ॲड. आर. एम. पाटील, ॲड. जे. ए. भोसले, ॲड. रवी संकपाळ, ॲड. दादासाहेब लंबे, ॲड. एस. ए. पाटील, ॲड.मंदार कुलकर्णी, ॲड. औरनाळे, ॲड. ए. एच. सुर्यवंशी, ॲड. सुषमा बेंद्रे, ॲड. ए. जी. चौगुले, ॲड. एस. पी. मार्गारेट, ॲड. संतोश पोतदार यांच्यासह संघटनेचे पदाधीकारी उपस्थित होते. निपाणी वकील संघटनेने घेतलेल्या या धाडसी, सामाजिक भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला बळ मिळाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta