Friday , October 23 2026
Breaking News

ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता टिकून

Spread the love

 

अण्णासाहेब हावले; बोरगावमध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : क्रीडा क्षेत्र हे येथे आयोजित युवकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता असून त्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ते क्रीडा क्षेत्रात निश्चितच यश संपादन करू शकतात, अशा युवकांना खेळातून प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे दस-या निमित्त युथ स्पोर्ट्सतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी अण्णासाहेब हावले व मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी शरद सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार, २० हजार, १० हजार रुपयांची बक्षीसे आणि शिल्ड देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास अनुज हवले, नगरसेवक रोहित पाटील, संजय हवले, बाळासाहेब बसन्नवर, विद्याधर अम्मन्नावर, शितल सोबाने, गुंडा गोरवाडे, शिवाजी भोरे, अजित रोड्ड, शिशिर सातपुते, विजय शिंगे, भरत पाटील, राजेंद्र मगदूम, यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *