


निपाणी (वार्ता) : परकीय ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध भारतात स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पेटवणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या कर्नाटक शासनाने काढलेल्या वीर ज्योतीचे शहरात विविध ठिकाणी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध मार्गावरून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली.
चिंगळे म्हणाले, वीर राणी कित्तूर चन्नमा या देशाचा खरा अभिमान आहेत. त्यांचे अलौकिक शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असून तो येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांनी वीर ज्योतीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. याशिवाय ‘वीर राणी चन्नम्मा की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमास समाधी मठातील मठाधिपती प्राणलिंग स्वामी, तहसीलदार सुरेश मुंजे, मिथुन अंकली, एम. एच. बरगाले, दीपक पाटील यांच्यासह तालुका प्रशासकीय अधिकारी, विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कित्तूर राणी चन्नम्मा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta