


निपाणी जनावरांच्या आठवडी बाजारातील चित्र; चारा-पाणीटंचाईचा पशुपालकांना धसका
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामात किरकोळ पाऊस वगळता मोठे पाऊस न झाल्याने तालुक्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवत असून पिकांना पाणी देणे ही अडचणीची झाले आहे. याशिवाय जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुपालकांच्या दावणी ओस पडत असून पशुधनाला आठवडी बाजाराचा रस्ता दाखविण्यात येत असल्याचे विदारक चित्र येथील जनावरांच्या आठवणी बाजारात दिसूत आहे.

पावसाअभावी शेतातील पिके होरपळून गेली असून चारा-पाणीटंचाईचा फटका पशुधनाला बसू लागला आहे. शहराच्या पश्चिम डोंगरी भागातील शेतकरी पशुपालन करतात. शेतीच्या कामांसासह दूध उत्पादनातून उत्पन्न मिळविण्यासाठी जनावरे पाळली आहेत. यंदा पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने सोयाबीनसह ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
——————————————————————-
‘अनेक वर्षात यंदा पहिल्यांदाच पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होऊन पाण्याअभावी पिके करपून गेली. जिथे माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे पशुधनाची तहान कशी भागवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
–सचिन पाटील, पशुपालक, निपाणी

Belgaum Varta Belgaum Varta