Friday , October 23 2026
Breaking News

रस्त्यावर भर ‘पूर’, पण नळापासून दूर!

Spread the love

 

निपाणीत ५ दिवसांपासून पाणीपुरवठा; गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

निपाणी (वार्ता) : पाणीटंचाईचे भीषण संकट असल्याने प्रशासनाने पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. मात्र, निपाणीमध्ये पाणी बचतीच्या या आवाहनाला हरताळ फासला जात आहे. शहराला पाणीपुरवठा पाइपलाइन, एअर व्हॉल्व मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर आणि गटारात वाहून जात आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक भागात तब्बल २५ दिवसांपासून नळाला पाणी येत असल्याने नागरिकांवर घागरभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निपाणीकरांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा पाइपलाइनचे एअर व्हॉल्व्या फुटेपर्यंत लिकेज झाले असून त्यातून पाण्याचा महापूर रस्त्यांवर वाहत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्ष नाही. नगरपालिकेचे कर्मचारी, पालिकेचा ताबा असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना जनतेच्या या प्रश्नांचे गांभीर्य नाही. एसी केबिनमध्ये बसून मूक बनलेले अधिकारी आणि नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे शहराची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
—————————————————————–

‘शहरातील अनेक भागासह उपनगरात नळांना तब्बल ५ दिवसातून एकदा अपुरे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तरीही प्रशासनातील अधिकारी, आयुक्तांचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यांना जनतेच्या पाण्याविना त्रासाचे काही देणेघेणे उरलेले आहे.’
-ॲड. संजय चव्हाण,
माजी शासन नियुक्त नगरसेवक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *