Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसाठी बैठक

बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट) आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात …

Read More »

परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ उद्या

बेळगाव : दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून श्री अम्माभगवान भक्तमंडळीसाठी खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालयात परमज्योति भगवती ऐश्वर्यपादुका दीक्षा समारंभ रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी होणार असून भक्तांनी ३.३०च्या आत हजर रहावे, बरोबर ३. ४५ वाजता आरती …

Read More »

मच्छे भागातील विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

बेळगाव : मच्छे भागात अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांनी आज सकाळी रास्तारोको केला. खानापूरहूनन निघालेल्या बसेस या फुल असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. परिणामी या भागातील विद्यार्थ्यांना तासंतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी मच्छे नेहरूनगर येथे रास्ता रोको करून बसचा …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने आर्ष विद्या केंद्रातील विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले. या आश्रमामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थिनी शिक्षणाकरिता परगावाहून या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता आले आहेत. या विद्यार्थिनींचा दिवाळी सण द्विगुणीत करण्याकरिता माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडून नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले. या गणवेश करिता मोलाचे सहकार्य केलेले खडेबाजार बेळगाव येथील …

Read More »

स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना मिळतो वाव : लक्ष्मण पवार

गणेश महोत्सव 2021 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात बेळगाव : स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळतो. यासाठी विविध संघ-संस्थांच्यावतीने आयोजित स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांनी आपल्या अंगभूत कलेला वाव द्यावा असे कर्नाटक राज्य सौहार्द सरकारी फेडरेशनचे संचालक लक्ष्मण पवार म्हणाले. विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण …

Read More »

सांबरा येथे दोघा सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : भाऊबीजेनंतरचा दिवस हा बहिणतीज म्हणून ओळखला जातो. बहिणींच्या दृष्टीने विशेष आनंदाचा असणारा हा सण सांबरा येथील दोघा बहिणींसाठी कर्दनकाळ ठरला. तलावात बुडून दोघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी महादेव तलाव येथे घडली. त्यामुळे सांबरा परिसरावर शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून घरामध्ये झालेल्या पूजेचे …

Read More »

राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरात 7 रुपये कपात : मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळुरू : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात कपात केली असून आज रात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी रात्री पेट्रोल दरात ५ आणि डिझेल दरात १० …

Read More »

कावळेवाडी येथील महात्मा गांधी वाचनालयाचा वर्धापनदिन ७ नोव्हेंबर रोजी

बेळगाव : महात्मा गांधी वाचनालयचा तिसरा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. या साहित्यिक कार्यक्रमाला मालोजीराव अष्टेकर (माजी महापौर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.पहिल्या सत्रात निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. याचे सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी हे करणार आहेत. या बहारदार संमेलनात सहभागी… कवी शिवाजी …

Read More »

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमावासीयांनी पाळला काळादिन!

बेळगाव : गेली ६५ वर्षे सीमाभागातील मराठी लोक संयुक्त महाराष्ट्र पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. भाषावार प्रांतरचना करतेवेळी मुंबई प्रांतातातील चार जिल्हे हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामुळे लाखो मराठी लोकांना इच्छेविरुद्ध तत्कालीन म्हैसूर राज्यात जावे लागले. तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५६ जेव्हा राज्य पुनर्रचना …

Read More »

पाच महिला कराटेपटूंची निवड

बेळगाव : ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतीने घेण्यात येणार्‍या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेकरिता बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपचे 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेले बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरुचकडे रवाना झाले. दिया …

Read More »