शिवमोग्गा : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर अद्याप पडदा पडल्याचं चित्र नाही. दिवसेंदिवस कट्टर समूहांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रकार सुरू असून यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तणावाचं वातावरण आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात आणखी तणाव वाढला. या 26 वर्षांच्या कार्यकर्त्याने …
Read More »LOCAL NEWS
चांगळेश्वरी स्पोर्टसने पटकावले श्री गणेश चषक
येळ्ळूर : येळ्ळूर येथे नुकत्याच झालेल्या फुल्लपीच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा ग्रामीण भागातील संघासाठी मर्यादित होती. या स्पर्धेत एकूण 40 संघांनी भाग घेतला होता. रविवार दि. 20/02/2022 रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यासाठी चांगळेश्वरी स्पोर्ट्स व बिडी संघ आमनेसामने होते. यात चांगळेश्वरी स्पोर्टसने श्री गणेश चषक पटकाविले. …
Read More »आक्षेपार्ह सीडी प्रकरण; रमेश जारकीहोळी पुन्हा अडचणीत
उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर आरोप असलेल्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणी विशेष तपास पथकाला (एसआयटी) अंतिम अहवाल सादर करण्याची उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. एका महिलेवरील अत्याचाराच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी सरकारने विशेष …
Read More »खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा बेळगावात सत्कार
बेळगाव : बेंगळुरातील ‘त्या‘ शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक घातल्याबद्दल सन्मान माझ्या राजांच्या विटंबना झालेल्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालणे, तेथे शिवगर्जना करणं ही एक शिवभक्त म्हणून भावना होती. महाराजांच्या गनिमीकाव्याचा वापर करून बंगळुरूत शिवजयंतीदिनी त्याच पुतळ्याला दुग्धभिषेक केला. बेळगावातील लोकांना पूर्वकल्पना न देता गनिमीकाव्याने सकारात्मक संदेश देत आम्ही बंगळुरूत शिवपुतळ्याचा अभिषेक केला आहे, त्याच …
Read More »कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे
बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या सर्वच नूतन पदाधिकार्यांची निवड अविरोध झाली आहे. संघटनेच्या गौरवाध्यक्षपदी भीमशी जारकीहोळी यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावमध्ये आज सदर संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार …
Read More »शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
बेळगाव : मिलिटरी महादेव मंदिरानजीक असलेल्या शिवतीर्थ याठिकाणी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिटरी महादेव मंदिरानजीक शिवतीर्थावर आज शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »नाईट क्लब आणि पब्समधील गैरप्रकारांवर निर्बंध घाला : नगरसेवक शंकर पाटील
बेळगाव : बेळगाव शहरातील नाईट क्लब आणि पब्समध्ये घडत असलेल्या बेकायदेशीर आणि असंबद्ध प्रकारांवर तात्काळ निर्बंध घातले जावेत अशी मागणी करून ही कारवाई 28 फेब्रुवारी पूर्वी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डाॅ. शंकरगौडा बी. पाटील यांनी दिला आहे. नगरसेवक डाॅ. शंकरगौडा पाटील यांनी उपरोक्त मागणीचे …
Read More »उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज चालना दिली. त्यामुळे श्रीनगरमधील शिवालय कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कंपाऊंड भींत, महांतेशनगरमधील मुख्य रस्त्याच्या कामासह गजानन गल्ली व दीपक गल्ली येथील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरात बहुतांश भागात मात्र स्मार्टसिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. …
Read More »युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : १९/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ०६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना …
Read More »जिल्हा इस्पितळ परिसरात मराठी भाषेत फलक लावावेत : म. ए. समितीचे निवेदन सादर
बेळगाव : मराठी भाषिक रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात सर्वत्र मराठी भाषेतदेखील फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारत सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि बेळगावच्या उपायुक्तांना सूचना दिल्या होत्या . उपायुक्तांनी मराठी लोकप्रतिनिधींशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta