Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

शिवमोगा दंगलीला ईश्वरप्पा जबाबदार : सिद्धरामय्या

बेंगळुरू : शिवमोगा येथील बजरंग दलाच्या २३ वर्षीय हर्ष नामक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास घ्यावा, असे आवाहन करत याठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलाय. बेंगळूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या तीन दिवसात शिवमोगा जिल्ह्यात …

Read More »

तारांगणतर्फे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा

बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल …

Read More »

डी. के. शिवकुमारांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांचा संताप

बेंगळुर : कायदा व सुव्यवस्था ढासळल्यानेच शिमोग्यात हर्ष या कार्यकर्त्याची हत्या झाली, या डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र चांगलेच भडकले. त्यांच्या सत्ता काळात अशी कोणती घटना घडली नव्हती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे असे आव्हानच त्यांनी शिवकुमारांना दिले. बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, शिवकुमारांसारख्या ज्येष्ठ …

Read More »

खो-खो स्पर्धेत कडोली संघ विजेता

  उपविजेता चिरमुरी संघ बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आणि नवज्योत खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने खो-खो स्पर्धेचे आयोजन सुळगा (हि.) येथे रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. एक गाव एक संघ मर्यादित ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेला बेळगाव परिसरातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. …

Read More »

मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न

  बेळगाव : रविवार दिनांक 20/02/2022 रोजी श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भगवा ध्वज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन …

Read More »

17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी रोजी

येळ्ळूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार ता. 20 रोजी सायंकाळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी साहित्य …

Read More »

हालगा -मच्छे बायपासला पुन्हा स्थगिती

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, अशा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशा विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात केलेले अपील फेटाळून लावताना न्यायालयाने आज सोमवारी बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे. हालगा -मच्छे बायपासच्या कामाला चौथ्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात राष्ट्रीय …

Read More »

हिंदू कार्यकर्त्याची हत्या; आरोपीना लवकरच अटक करू : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : शिमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बंगळुरात सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, शिमोगा व परिसरातील जनतेला मी आवाहन करतो की, या प्रकरणी न्यायोचित मार्गाने तपास करून आरोपीना अटक करण्यात येईल. त्यांना …

Read More »

मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची काँग्रेसची मागणी

बेळगाव : बेळगाव जिल्हा काँग्रेसने, ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री ईश्वराप्पा यांना मंत्रिपदावर बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेसच्यावतीने सदर मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपाल गेहेलोत यांना धाडण्यात आले आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी, तिरंगा …

Read More »

हिजाब घालून वर्गात प्रवेश न दिल्याबद्दल विद्यार्थिनींकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बेळगाव : हिजाब आणि बुरखा घालून पूर्वतयारी परीक्षेला उपस्थित राहू न दिल्याने लिंगराज महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थिनींनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी म्हणाल्या की, धार्मिक नियमांचे पालन करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मुस्लिम मुली हिजाब आणि बुरखा घालतात मात्र आता वर्गात प्रवेश बंदी करण्यात येत आहे. …

Read More »