Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम यांची नियुक्ती

  बेळगाव : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली …

Read More »

संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर; आयुक्तालयात बैठक

  बेळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे. तसेच पांरपारिक वाद्यांनाच …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवारी

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शुक्रवार दिनांक 26 रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओवरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीमध्ये एक जून 1986 मधील कन्नड सक्तीतील हुतात्म्यांना अभिवादन तसेच विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने आजारांविषयी जनजागृती

  बेळगाव : नुकताच दिनांक 16 मे रोजी राष्ट्रिय डेंग्यू दिवस झाला आणि आता पावसाळ्याला सुरूवात होईल या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने येळ्ळूर येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आजार हमखास बळावतात. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती हाेण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नामुळे नाला सफाई सुरू

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील तुंबलेल्या नाल्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेला काही महिन्यांपासून स्वच्छते अभावी तुंबला होता. तुंबलेल्या या नाल्यामुळे पावसाळ्यात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते हे लक्षात …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील तिघांचे यूपीएससी परीक्षेत यश

  बेळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा रोवला आहे. सौंदत्ती तालुक्यातील तल्लूरच्या श्रृती गट्टीने 362 वे स्थान मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. कागवाड तालुक्यातील उगारच्या आदिनाथ तमदडीने 566 वे व चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडीच्या अक्षय पाटीलने 746 वे स्थान मिळवले. श्रुतीने पाचव्या प्रयत्नात हे यश …

Read More »

यू. टी. खादर यांची सभापतीपदी निवड

  बेंगळुरू: माजी मंत्री आमदार यू. टी. खादर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार यू. टी. खादर यांची बिनविरोध निवड झाली असून आर. व्ही. देशपांडे यांनी खादर त्यांच्याकडे पदभार सोपवला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यू. टी. खादर यांचे …

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांची दिल्ली वारी

  बेंगळुरू : काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीत आमंत्रित केले आहे. डीके शिवकुमार आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. तर सिद्धरामय्या सायंकाळी रवाना होतील. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही दिल्लीला बोलावले असल्याचे कळते. गुरुवारी या संदर्भात एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन …

Read More »

दीर्घ पल्ल्याच्या सायकल शर्यतीत रोहन रमेश देसाई यांचे सुयश

  बेळगाव : बॉक्साइट रोड हनुमान नगर येथील गेअर हेड सायकल शोरूम स्टुडिओचे संचालक रोहन रमेश देसाई यांनी हुबळी सायकल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 600 किलोमीटर सायकल शर्यत निर्धारित वेळेच्या अगोदर पूर्ण करून सुयश सुयश संपादन केले आहे. अँडॅक्स इंडिया रँडोनियर्स, फ्रान्स या संस्थेशी संलग्न असलेल्या हुबळी सायकल क्लब या …

Read More »

महामेळावा खटल्यातील “त्या” कार्यकर्त्यांनाही जामीन मंजूर

  बेळगाव : डिसेंबर 2021 च्या महामेळावा खटल्यातील 29 पैकी 27 जणांना गेल्या 13 मार्च रोजी जीएमएफसी चतुर्थ न्यायालयाने जमीन मंजूर केला होता, तर बाहेरगावी असल्याने हजर न झाल्याने संतोष मंडलिक व सुरज कणबरकर यांना चतुर्थ न्यायालयाने वारंट बजावले होते. आज त्यांना 30000 च्या हमी बॉण्डवर जामीन मंजूर करण्यात आला, …

Read More »