Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कोलार येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची इयत्ता 9 ची विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गोल्लार हिने 82 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. कार्तिक पावसकर याने 55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला. आता ऐश्वर्या गोल्ल्यार हिची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी …

Read More »

सुभाषचंद्रनगर समुदाय भवनाचा वर्धापन दिन उत्साहात

  बेळगाव : शहरातील सुभाषचंद्रनगर येथील सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेने बांधलेल्या समुदाय भवनाचा 11 वा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समुदाय भवन सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी राधिका तेंडुलकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची एकच गर्दी

  उमेदवारीसाठी अर्जाचा अखेरचा दिवस, मुदत वाढीची शक्यता बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या ईच्छुकांनी कॉंग्रेस कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी केली होती. उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस होता. परंतु अर्जासाठीची मुदत वाढविण्याची मागणी विचारात घेऊन मुदत वाढण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रानी दिली. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू …

Read More »

बालदिनानिमित्त ‘एंजल’तर्फे शाळांमध्ये मिठाई -खाऊचे वाटप

  बेळगाव : शहरातील एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली बाल दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी कन्नड व मराठी शाळांना मिठाईचे वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांनी फुलबाग गल्ली येथील शाळा नंबर 7, …

Read More »

बेनकनहळ्ळीत रस्ते बांधकामाचा शुभारंभ

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बेनकनहळ्ळी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 45 लाख रु. अनुदान मंजूर केले आहे. आज महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने आरोग्य तपासणी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकाळी सेवा केंद्र यांच्यामार्फत विविध गुणदर्शनच्या कार्यक्रम डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस क्लिनिकमध्ये शनिवारी संपन्न झाला. प्रारंभी रवींद्रनाथ जुवळी यांनी गीत सादर केले. त्यानंतर डॉक्टर सुचिता हवालदार यांनी दातांची निगा कशा प्रकारे ज्येष्ठांनी ठेवावी. याची सविस्तर माहिती दिली. तसेच दात खराब होण्याचे …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर रोजी भव्य मॅरोथॉन

  बेळगाव : कावळेवाडी…(बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर 22 रोजी भव्य मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीनगटात घेण्यात येतील. पुरुष खुलागट, महिला खुलागट व चौदा वर्षेखालील कुमार-कुमारीकासाठी बक्षिसे-ओपन पुरुष गट..प्रथम 3001/-, द्वितीय 2500/-, तृतीय 2000/- चौथा 1500/-, पाचवा 1000/- महिला ओपनगट पहिले 2001/-, द्वितीय …

Read More »

हिंडलगा येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रा उत्सव संघाच्या वतीने कनकदास जयंतीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शंभर वर्षानंतर भरविण्यात आलेल्या यात्रेनिमित्त यावर्षीचा दुसरा दीपोत्सव दि. 11 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. दीपोत्सव उद्घाटक गायत्री ज्युलर्सचे …

Read More »

मराठा समाजाची ब्लड बँक होणार!

  बेळगाव : बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज वैद्यकीय विभाग यांच्या संकल्पनेतून मराठा ब्लड बँकची स्थापना करण्याचे योजले आहे. या योजनेअंतर्गत चर्चा करण्यात आली की, बेळगावमध्ये ब्लड बँकची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मराठा ब्लड बँक निर्माण करण्याचे ठरविले गेले आहे व पुढील उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात आली. या …

Read More »

वैजनाथ देवस्थानात कीर्तन महोत्सव

  बेळगाव : श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी (ता. चंदगड) येथे सप्तशतकोतर रौप्य महोत्सवी समाधी उत्सवानिमित्त एक दिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे ध्वजारोहण आणि उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले, मंदिरे ही आमची शक्तिस्थानी …

Read More »