Sunday , July 26 2026
Breaking News

सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी यांच्या वतीने भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत 4 व 5 ऑक्टोबरला

Spread the love

 

दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली होती. पावसातील व्यत्ययामुळे (जसे की सततचा पाऊस) रद्द करून पुढे ढकलण्यात आलेली आहे. हीच शर्यत श्री. बाळूमामा जन्मोत्सव निमित्त दिनांक ०४/१०/२०२५ व ०५/१०/२०२५ या तारखेला घेण्यात येणार आहे. याची सर्व बैल जोडी मालक, चालक आणि प्रेक्षकांनी सुद्धा नोंद घ्यावी..

दिनांक ०४/१०/२०२५ या दिवशी सकाळी ०८ वाजता मोदगे शर्यत पट्यावर श्री. बाळूमामा फोटो पूजन होईल आणि त्यानंतर सर्व शर्यत प्रेमींना श्री. पिंटू कोकितकर (सुमित कंट्रक्शन, मोदगे.) यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी सर्व शर्यत प्रेमींनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा..

सरपंच चषक फौंडेशन, मोदगे यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे की पंचक्रोशीत कुठेही शर्यत ठेवण्यासाठी हि तारीख धरू नये ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.!

तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. शर्यत दोन दिवस आहे.

पुढील प्रमाणे बक्षीसे अशी आहेत

प्रथम क्रमांक – २५०००/-
द्वितीय क्रमांक – २१०००/-
तृतीय क्रमांक – १८०००/-
चतुर्थ क्रमांक – १५०००/-
अशी एकूण २८ बक्षीसे आहेत व २९ वा लकी नंबर आहे.

प्रवेश फी : २५००/-

स्पर्धेचे ठिकाण : लाल मातीचा फज्जा, मोदगे

या कार्यक्रमाचे नियोजक : समस्त मोदगेकर ग्रामस्थ, महाराष्ट्र राज्य संचलित बैलगाडी संघटना चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गज्या प्रेमी राजगोळी खुर्द.

या कार्यक्रमाचे समालोचक – श्री. भारत कांबळे काम पाहणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : विलास कोकितकर 8152013102,  प्रशांत शिंत्रे- 9324396057

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *