गुवाहाटी : भारत आणि श्रीलंकेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज मंगळवारी (१० जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.
टी 20 मालिकेत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात रोहित शर्मा पुनरागमन करणार आहे. विराट कोहली, मोहम्मद शमी आणि के.एल. राहुल यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू देखील खेळताना दिसणार आहेत.
मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला गुवाहाटीत खेळवण्यात येईल. त्यानंतर दुसरा सामना कोलकताच्या ईडन गार्डनवर १२ जानेवारीला खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाईल. मालिकेतील तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होतील.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह