Friday , September 13 2024
Breaking News

गुजरातचा मुंबईवर दणदणीत विजय; पहिल्याच सामन्यात ६ धावांनी उडवला धुव्वा

Spread the love

 

अहमदाबाद : गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ६ धावांनी शानदार विजय नोंदवला. ६ चेंडूत १९ धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पण पुढच्या दोन चेंडूवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने दणदणीत विजय नोंदवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सने ११ वर्षांचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.

मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना मुंबईची सुरूवात विकेटने झाली. मुंबईनेही खातेही उघडले नव्हते आणि इशान किशन ओमरजाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने एकाच षटकात १९ धावांची लूट केली पण त्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि रोहित शर्मा ने मुंबईचा डाव उचलून धरला आणि त्यांनी संघाची धावसंख्या १०० पार नेऊन पोचवली. रोहितने बाद होण्यापूर्वी २९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. साई किशोरच्या गोलंदाजीवर पायचीत झाल्याने त्याचे अर्धशतक हुकले. तर विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसचेही अर्धशतक हुकले. त्याने ३८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४६ धावा करत मोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्माच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली. गुजरातने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला. तिलक वर्मा (२५), टीम डेव्हिड (११) मोठी धावसंख्या करू शकले नाहीत ज्याचा फटका संघाला बसला. हार्दिकने १ षटकार आणि १ चौकार लगावत संघाला विजयाच्या जवळ आणले पण बाद झाल्याने विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.

गुजराजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ओमरजाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

तत्पूर्वी मुंबईच्या संघाने शानदार क्षेत्ररक्षण करत गुजरातच्या धावांवर आपला अंकुश ठेवला. पण मुंबईच्या गोलंदाजीची सुरूवात फारच खराब झाली. बुमराह संघात असतानाही मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने स्वत: पहिले षटक टाकले आणि त्याची साहाने चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुसऱ्या षटकातही गुजरातच्या फलंदाजांनी त्याला चोप दिला. त्यानंतर बुमराहने साहाला १९ धावांवर क्लीन बोल्ड करत पहिली विकेट मिळवून दिली. गुजरातकडून गिलने ३१ धावा केल्या तर बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्याने साई सुदर्शनचे अर्धशतक हुकले. त्याने बाद होण्याआधी ३९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. ओमरजाईने छोटी पण प्रभावी १७ धावांची खेळी केली.

मिलर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तोही मोठी खेळी करू शकला नाही. पण राहुल तेवतियाने १८व्या षटकात १९ धावा कुटत संघाला १६८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने बाद होण्यापूर्वी १५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या.

About Belgaum Varta

Check Also

विनेश फोगटची रौप्य पदक मागणीची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Spread the love  नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *