बेंगळुरू : सदाशिवनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे.
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान करण्याचे काम काहींनी कर्नाटकातील काही भागांमध्ये केले. लाल-पिवळ्याची होळी केल्याचा बदला घेण्यासाठी पुतळ्यावर काळा रंग ओतल्याचे संदेश पुतळ्याची विटंबना केल्यानंतर समाजकंटकांकडून पाठविण्यात येत आहेत. तसेच रंग ओतण्याचा व्हिडीओही व्हायरल केला आहे.
युवा समितीचे आज निवेदन
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची सदाशिवनगर बंगळूर येथे विटंबना करण्यात आली आहे. तसेच चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळण्यात आला. त्याचा निषेध करत समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …