Tuesday , September 17 2024
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

    खानापूर : विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ९) रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीमध्ये चर्चा करून खानापूर तालुक्याच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे …

Read More »

मद्यपीकडून बार मॅनेजरवर हल्ला; काकती येथील घटना

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त काल शनिवारी दारूविक्रीवर बंदी असल्याने आज रविवारी पहाटेच काकती येथील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसून दारू प्राशन करणाऱ्या एका मद्यपी व्यक्तीने बार मॅनेजरवर जबर हल्ला केला. यामध्ये बार मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी सुनील …

Read More »

नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी गेलेल्या बेळगावच्या दोन कमांडोचा मृत्यू

  बेळगाव : नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी गेलेल्या बेळगाव येथील कमांडो सेंटरच्या दोन कमांडोचा बोट उलटल्याने मृत्यू झाला. काल सकाळी बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण विभागाच्या जवानांना नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी तिलारी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात आणण्यात आले होते. दरम्यान नदी क्रॉसिंग प्रशिक्षण सुरु असताना बोट उलटली यामध्ये बेळगाव येथील जेएल विंग कमांडो ट्रेनिंग …

Read More »

आफ्रिकेतील रवांडा देशाच्या उच्चायुक्तांची बेळगावला भेट

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पूर्व आफ्रिकन देश रवांडाच्या उच्चायुक्त श्रीमती जॅकलिन मुकांगिरा यांनी सुवर्ण विधानसौधला भेट दिली. यावेळी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जॅकलिन यांचे स्वागत केले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज तसेच विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघासाठी हा मोठा धक्का आहे. इंग्लंड क्रिकेट संघात मोईन अलीचे योगदान खूप महत्त्वाचे होते. त्याने इंग्लंडला दोन विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. ज्यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे. ३७ वर्षीय मोईनने नुकतेच एका मुलाखतीत …

Read More »

महिलांचे नग्न व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; बेळगावात विचित्र प्रकार

  तीन गुन्हे दाखल बेळगाव : मुंबई क्राईम ब्रँच, गुप्तचर विभागाकडून व्हिडीओ कॉल केला असल्याचे भासवून ब्लॅकमेल करून महिलांचे नग्न व्हिडिओ काढल्याची घटना बेळगावात घडली आहे. याप्रकरणी बेळगाव सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले की, बेळगावात तीन घटना घडल्या आहेत. मुंबई …

Read More »

शिनोळी बु. येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

  शिनोळी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम शिनोळी बुद्रुक, ता. चंदगड – 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनानिमित्त ग्राम पंचायत शिनोळी बु.च्या वतीने विविध शाळांतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच गणपत कांबळे यांनी भूषविले, तर उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी नवीन शैक्षणिक संकल्पनांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात विद्या मंदिर …

Read More »

ट्रॅक मॅनच्या कार्यतत्परतेमुळे वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

कुमठा : ट्रॅक मॅनच्या कार्यतत्परतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला अन्यथा शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता.  कोकण रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक मॅन महादेवाच्या या कार्याबद्दल कौतुक केले आहे. कोकण रेल्वेच्या कुमठा-होन्नावर दरम्यान ट्रॅक जोडणीचे वेल्डिंग करणे बाकी होते. बुधवारी पहाटे 4.50 वाजता ट्रॅक मॅन महादेवच्या हा प्रकार लक्षात आला. …

Read More »

बेळगाव शहर, उपनगरात गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत

  बेळगाव : मागील काही दिवसांपासून आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेशभक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले आणि श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. आपल्या लाडक्या बाप्पाला मोदकाचा तसेच गोडधोडाचा …

Read More »

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलचे घवघवीत यश

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कास्यपदक मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक : वेदांत मासेकर (73 किलो वजन गट), अंजली शिंदे (40 किलो वजन गट), रोहन नायकोजी (45 किलो वजन गट) द्वितीय क्रमांक : …

Read More »