बेळगाव : “आचार्य अत्रे हे आभाळाएवढे मोठे साहित्यिक होते. ते साहित्य सम्राट होते. अत्रे म्हणजे चिरंतन मूल्ये जपणारा साहित्यिक काव्याचा जनक” असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार …
Read More »‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निपाणीत सार्वजनिक गणेशांचे विसर्जन
निपाणी (वार्ता) : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी, अशी प्रार्थना करत सार्वजनिक गणेश मंडळासह गणेशभक्तांनी शनिवारी (ता. ६) गणरायांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात “पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणात निरोप दिला. दहा दिवसांच्या कालावधीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष शिगेला पोहचला असला …
Read More »गणेश विसर्जनावेळी जक्कीन होंडा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
बेळगाव : गणेश विसर्जनाची वेळी बेळगाव शहरात एका व्यक्तीचा जक्कीन होंडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेळगाव शहरातील जक्कीन होंडा तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. घरात स्थापित गणेश मूर्तीचे तलावात विसर्जन सुरू असताना ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी तलावात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोब …
Read More »गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू
खानापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे असून तो आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्या आचार्य अत्रे पुरस्काराचे वितरण
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. वाचनालयाच्या गणपत गल्ली, बेळगाव येथील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांना वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अनंत लाड यांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे. यानिमित्त …
Read More »नाथ पै चौक मंडळाने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला : प्रकाश नंदीहळी
बेळगाव : अलीकडच्या काही वर्षात डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव असे एक समीकरण बनलेले पाहायला मिळते. उत्सवातून प्रबोधनात्मक विधायक कार्य घडणे आवश्यक आहे. मात्र असे कार्य कमी घडताना दिसत आहे. मात्र, बॅरिस्टर नाथ पै चौक मंडळांने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा केला आहे, असे प्रतिपादन विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश …
Read More »पिरनवाडीत हिंदू -मुस्लिम ऐक्यात गणेशोत्सव, ईद साजरा
बेळगाव : श्री गणेशोत्सव काळातच काल शुक्रवारी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण साजरा झाला. याचे औचित्य साधून छ. शिवाजी महाराज चौक, पिरनवाडी येथील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाने मुस्लिम बांधवांना श्रींच्या आरतीचा मान देऊन हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. छ. शिवाजी महाराज चौकातील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये काल शुक्रवारी …
Read More »विनायक गुंजटकर यांची सतर्कता; हरवलेली ती दोन्ही मुले सुखरूप सापडली
बेळगाव : अनगोळ शिवशक्ती नगर मधून काल दुपारी तीन तीस वाजता गल्लीतील दोन मुले गणपती बघायला जातो म्हणून घराबाहेर गेली होती. आज सकाळ झाली तरी ती दोन्ही मुले घरी आतापर्यंत पोहोचलेली नव्हती. याबद्दलची माहिती माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांना मिळाली. विनायक गुंजटकर यांनी तात्काळ सोशल …
Read More »श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; 14 ड्रोन तर 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
बेळगाव : आज शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्थेच्या संदर्भात विशेष काळजी घेऊन तयारी केली आहे. श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आम्ही आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहोत. नियमांचे पालन करा …
Read More »श्री मराठा संस्थेचा वर्धापन दिन : वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा; अध्यक्ष प्रशांत नाईक
निपाणी (वार्ता) : सामान्य कुटुंबातील नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा सौहार्द संस्थेने वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्था आणि संचालकावर सर्वसामान्य ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. ही संस्था नागरिकासाठी असून पुढील काळात शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवकांना आर्थिक बळ देत स्वावलंबी घडविणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta