Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

मानद डॉक्टरेट हा तर संस्थेचा सन्मान : डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर)

  खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबदल सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलताना म्हणल्या की, “मला मिळालेली मानद डॉक्टरेट हा मराठा मंडळ संस्थेचा सन्मान आहे. मराठा मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 11 जानेवारी ते 13 जानेवारी या तीन दिवसांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला अनुक्रमे डाॅ. नम्रता मिसाळे, प्रा.हर्षदा सुंठणकर, श्री.राजकुमार पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. शाळेमध्ये दोन वर्षानंतर हे स्नेहसंमेलन संपन्न झाले.शाळा मुलांमध्ये पेरत असलेले विचार मुलांच्या विविध गुणदर्शनातून …

Read More »

संत मीरा स्कूल गणेशपूर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

  बेळगाव : संत मीरा स्कूल गणेशपूर येथील विद्यार्थ्यांच्या सप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर कर्नल श्री. दीपक कुमार गुरूंग तसेच डॉ. सब्बाना तलवार (विधानपरिषद सदस्य), श्री. शांतिलाल पोरवाल (इंडस्ट्रियलीस्ट व शांती आयर्नचे मालक) हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन …

Read More »

मोहनगा दड्डी येथील भावकेश्वरी यात्रा 6 फेब्रुवारीपासून

  हुक्केरी : प्रतिवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर बेळगावसह, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे दड्डी (मोहनगा-दड्डी) भावकेश्वरी यात्रेला दि. ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि उत्तर कर्नाटक बेळगाव …

Read More »

२४ तास नळ पाण्याच्या हवेमुळे नागरिकांची लूट

आम आदमी पक्षाचा आरोप : मंगळवारी काढणार मोर्चा निपाणी (वार्ता) : पाणी म्हणजे जीवन असून ती जीवसृष्टीची मूलभूत गरज असून पाण्याचे बाजार करू नये. किमान  नगरपालिकेने पाण्याकडे व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता मिळकतीचे साधन बनवू नये. पाणी येण्यापूर्वी हवेच्या दाबाने मीटर फिरते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे. त्यामुळे २४ …

Read More »

महाविकास आघाडीत समन्वय हवा, काँग्रेसचे कान उपटत संजय राऊतांचा सल्ला

  मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील बिघाडी दिसत आहे. काँग्रसचे निष्ठावान असलेले सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय …

Read More »

‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन

  नवी दिल्ली : पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खासदार चौधरी संतोख सिंह …

Read More »

कोल्हापूर- बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर – बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे …

Read More »

17 जानेवारीचा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून प्रयत्न करावेत. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात “चलो मुंबई” आंदोलन छेडण्याचा विचार मध्यवर्तीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर …

Read More »

मध्यवर्तीच्या बैठकीत चौघांनी घातला गोंधळ!

  बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुका समितीची कार्यकारिणी लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा मराठी भाषिकांतून व्यक्त होत होती. खानापूर तालुका समितीची एकीची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून दोन्ही गट प्रमुखांच्या संमतीने पूर्ण झाली व नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खानापूर तालुका समितीची विस्तृत कार्यकारिणी …

Read More »