Sunday , September 20 2026
Breaking News

‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन

Spread the love

 

नवी दिल्ली : पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
खासदार चौधरी संतोख सिंह हे राहुल गांधी यांच्याबरोबर ‘भारत जोडो यात्रे’त चालत होते. त्यावेळी चालत असताना संतोख सिंह यांची तब्येत खालावली. संतोख सिंह यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालं असल्याचं सांगितलं आहे.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती मिळताच ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करण्यात आली. तसेच, राहुल गांधी रुग्णालयात दाखल झाले.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *