Tuesday , September 22 2026
Breaking News

Belgaum Varta

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवडणूक रिंगणात : राजू पोवार

धजदचा प्रचार प्रारंभ निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षात निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात आपणासह कार्यकर्त्यांना पोलीस …

Read More »

आदर्श सोसायटीच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

  बेळगाव : येथील अनगोळ रोड स्थित दि. आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या 31व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे कर्मचारी, सभासद व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात डेक्कन मेडिकल सेंटरचे तज्ञ …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात पंतप्रधान मोदींच्या दोन प्रचार सभा होणार

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव जिल्ह्यातील कुडची (ता. रायबाग) आणि कित्तूर येथे प्रचार सभा होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. …

Read More »

शहापूर भागात घुमला मराठीचा बुलंद आवाज : रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ काल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले रोड येथील बॅंक ऑफ इंडिया येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. महात्मा फुले रोड येथून बुरजाई गल्ली, कोरे गल्लीतील मधल्या मार्गाने मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, कोरे …

Read More »

आर. एम. चौगुले यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

  बेळगाव : शिवसेना सीमाभाग बेळगाव यांच्यावतीने तालुका म. ए. समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. तसेच समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत, असे आश्वासनही शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दिले. मंगळवारी सकाळी आर. एम. चौगुले यांच्या प्रचारकार्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची …

Read More »

हलगा-बस्तवाड भागात आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी

  बेळगाव : हलगा-बस्तवाड भागात म. ए. समिती ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची मंगळवारी सायंकाळी अभूतपूर्व प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीत कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार करून पाठिंबा जाहीर करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी हलगा गावातून चौगुले यांची प्रचारफेरी लक्षणीय ठरली. या …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेचा आजचा मार्ग

  बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 26 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी उद्यान येथून होणार आहे. होसूर मठ गल्ली, बसवाण गल्ली, ओमकार नगर, श्रुंगेरी कालनी, टीचर्स कालनी, जोशी मला, संभाजी रोड, खासबाग येथे सांगता. सायंकाळी …

Read More »

भाजपमुळे राज्याला भ्रष्टाचाराचा कलंक

  माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या : निपाणीत प्रचार सभा निपाणी (वार्ता) : भाजपा सरकारने दिलेल्या वचना पैकी एकही वचन पूर्ण करता भ्रष्टाचार करण्याचा उच्चांक केला आहे. गेल्या चार वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. महागाई वाढवून सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणले आहे. शिवाय कर्नाटक राज्याला भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत …

Read More »

आर. एम. चौगुलेंच्या प्रचार पदयात्रेत हजारो युवक सहभागी

  समितीमय वातावरण; देसुरात जनजागृती; ज्येष्ठासह महिलांचा सहभाग बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अभियंता आर. एम. चौगुले तथा राजू चौगुले यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून सोमवार दिनांक 24/04/2023 रोजी सकाळी सात वाजता देसूर तालुका बेळगाव येथे मोठ्या जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी देसूर गावातील …

Read More »

खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय

  खानापूर : खानापुरात अवैद्य वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून दिवसाढवळ्या वाळू उपसा व वाळू वाहतूक राजरोसपणे केली जाते. पोलिसांना किंवा इतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी वाळू वाहतूकदार सुसाट वेगाने वाहने चालवितात. एखाद्या वेळेस वाहनावरील नियंत्रण सुटून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता …

Read More »