बेळगाव : कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमावासीयाबरोबर असेल असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांनी काढले. श्री. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सीमाभागातील मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने कोल्हापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार श्री. …
Read More »जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई
खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले. खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प …
Read More »एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे …
Read More »सातव्या वेतन आयोगाची स्थापना
मुख्यमंत्री बोम्मईंची घोषणा बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली असून बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा आणि इतर सुविधांच्या विस्तारासंदर्भात राज्य सरकारचे निवृत्त मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात एकाचा मृत्यू
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार तारीख 8 रोजी संध्याकाळी आठ वाजता घडली. सिद्धार्थ आनंदा कांबळे (वय 48) हालसिद्धनाथ नगर कोगनोळी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुळगाव दिंडेवाडी तालुका भुदरगड, सध्या …
Read More »खानापूरात एकीची वज्रमूठ!
खानापूर : दोन गटात विखुरलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत अखेर मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकी झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्तीने खानापूर समितीमध्ये एकी करण्याचा निर्धार केला. त्याअनुषंगाने आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवस्मारक येथे दोन्ही गटात …
Read More »आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या …
Read More »शिक्षक संघटनेचा २३ रोजी बंगळुरू येथे मोर्चा
शिक्षकांच्या विविध मागण्या : सहभागी होण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघटनेच्या निपाणी तालुका विभागातर्फे बंगळूर येथे विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २३) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्षअध्यक्ष टी. बी. बेळगली यांनी केले आहे. संघटनेच्या आयोजित बैठकीत त्यांनी ही …
Read More »निपाणी सद्गुरु हॉस्पिटलतर्फे विठ्ठल पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मॅक (कागल फाईव्ह स्टार कागल-हातकणगले औद्योगिक वसाहत) या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यात ऑननरी सेक्रेटरी पदावर सौंदलगा – कागल येथील उद्योजक विठ्ठल ईश्वर पाटील (कागल) यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल निपाणी येथील सद्गुरु हॉस्पिटलतर्फे डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला. निपाणी …
Read More »ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी भाविकांना खारीक – उदीचा प्रसाद
निपाणी : सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक हजरत दस्तगीर साहेब यांच्या ऊरूसाच्या तिसऱ्या दिवशी ८ रोजी पहाटे निपाणी येथे दर्गाहचे संस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचा निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवनिहालकर सरकार, दादाराजे देसाई – निपाणकर सरकार यांच्या हस्ते लवाजमा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta