Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

तांब्याची चोरी करताना ग्रामीण पोलिसांकडून पाच जणांना अटक

  बेळगाव: विविध कंपन्यांच्या केबल चोरी करताना पोलिसांनी पाच आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस-२०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक १२०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिरनवाडी नाका येथे ग्रामीण पोलिसांनी तपासणी केली असता आरोपींना तांब्याच्या तारा चोरताना पकडण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये …

Read More »

युवा समिती निपाणी विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची कार्यकारिणी जाहीर करून दोन वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने लढ्याला ऊर्जा देण्यासाठी तसेच संघटनेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी संघटनेची कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली. ती कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर …

Read More »

कर्नाटक सीमासमन्वयक मंत्र्यांचे “महाजन अहवाल”चे तुणतुणे कायम!

  बेळगाव : महाजन अहवाल हा अंतिम आहे, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासंदर्भात कन्नडवासियानी काळजी करण्याची गरज नाही. सीमावाद हा घटनात्मक विषय असून त्यावर सुनावणी घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे कर्नाटकचे कायदे व संसदीय कामकाज मंत्री, तसेच सीमासमन्वयक मंत्री एच. के. पाटील म्हणाले व पुन्हा एकदा महाजन …

Read More »

पाटील गल्ली येथील गणेश मंडळाचा “मराठी” फलक पुन्हा उभारला; मध्यवर्ती सार्व. गणेशोत्सव महामंडळाचा दणका!

  बेळगाव : महापालिका प्रशासनाने काल पाटील गल्ली येथे लावलेला मराठी फलक हटवल्याने मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाने जोरदार आवाज उठवताच खाली उतरवण्यात आलेला फलक आज शनिवारी पुन्हा पूर्वीच्या जागी बसवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे शहरातील पाटील गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने पाटपूजा केल्यानंतर शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या स्वागताचा मराठी भाषेतील भव्य …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगाव ग्रामीणच्या आमदार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची घेणार भेट

  बेळगाव : कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकमध्ये कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने उद्या रविवार …

Read More »

बेळगाव येथे राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे भव्य उद्घाटन

  बेळगाव : राज्यस्तरीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आज गांधी भवन, बेळगाव येथे भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन पोलीस उपायुक्त श्री. नारायण बरमणी आणि सुप्रसिद्ध मिस्टर आशिया बॉडी बिल्डर श्री. सुनील आपटेकर यांच्या हस्ते पार पडले. ही स्पर्धा बेळगाव ॲमॅच्युअर ज्युडो असोसिएशनच्या पुढाकाराने आणि अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व उपाध्यक्ष डॉ. …

Read More »

निपाणी, चिक्कोडी परिसरातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

  निपाणी : महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि बेळगाव जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. जिल्ह्यातील विविध गावे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुधगंगा नदीला पूर आल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तालुका प्रशासनाने निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील लोकांना नदीकाठच्या ठिकाणी न जाण्याचा …

Read More »

पत्नीसमोरच पतीची गळा चिरून घेऊन आत्महत्या; होन्निहाळ गावातील घटना

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ गावात एका पतीने पत्नी आणि सासऱ्या समोरच गळा चिरून आत्महत्या केली. मल्लप्पा कटबुगोळ (३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काल मल्लप्पा कटबुगोळ हा घरातील तांदूळ विकून दारू पिऊन घरी आला. पत्नीशी वाद घालून रात्रभर भांडण केले आणि तिच्यावर …

Read More »

गणेश मंडळाचा “मराठी” फलक महापालिका प्रशासनाने हटवला!

  बेळगाव : मराठी भाषेची कावीळ झालेल्या कन्नड संघटनांसह महानगरपालिका प्रशासनाची वक्रदृष्टी आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मराठी फलकांवर पडली आहे. पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शहीद भगतसिंग चौकात उभारलेला मराठी फलक पालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि. 25) रोजी हटविला. दरम्यान, कन्नड भाषेची सक्ती करणारा आदेश केवळ नामफलकापुरता मर्यादित असतानाही महापालिकेने शहरात …

Read More »

चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरण : न्यायमुर्ती कुन्हा अहवाल रद्द करण्यासाठी याचिका

  उच्च न्यायालयात २८ जुलैला सुनावणी बंगळूर : बंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत निवृत्त न्यायमूर्ती मायकल कुन्हा यांचा अहवाल रद्द करण्याची मागणी करणाऱ्या डीएनएने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी राज्य उच्च न्यायालयाने या महिन्याच्या २८ तारखेला निश्चित केली आहे. राज्य सरकारने न्यायमूर्ती मायकल कुन्हा यांचा अहवाल स्वीकारल्यानंतर आणि आरसीबी, डीएनए …

Read More »