Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

तब्बल आठ महिन्यानंतर मिळालेले खानापूर तालुका पंचायतीचे ईओ अधिकारी अद्यापही गैरहजर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …

Read More »

भारत जोडो पदयात्रेत ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी

  बेळगाव : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले. दीडशेहून अधिक वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्वजण संध्याकाळी बेल्लारीतील फेरीत सामील झाले. कर्नाटकात दाखल झालेल्या दिवसापासून बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पदयात्रेत …

Read More »

गोपाळ देसाई गटाचे आरोप बिनबुडाचे : बाळासाहेब शेलार

  खानापूर : 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुक्यात जनजागृतीचे वारे दोन्ही गटातून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिर खानापूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकी करणे ही काळाची गरज आहे. या हेतूने मागील आठवड्यात दोन्ही गटाच्या प्रत्येकी पाच सदस्यांची …

Read More »

’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत : कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के

  तरुणांनी जिद्दीने वाटचाल करुन यशस्वी उद्योजक बनावे कोल्हापूर (जिमाका) : तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, असे सांगून प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार्‍या अशा ’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. …

Read More »

जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघातर्फे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप

  बेळगाव : जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघ हिंदवाडी यांच्यातर्फे बांधकाम कामगार कार्डधारकांना लग्नासाठी कर्नाटक गव्हर्मेंटतर्फे मिळणारे 50 हजार रुपयाचे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी बसरीकट्टी, शिंदोळी, मास्तमर्डी, आलतगा व बेळगाव येथील कामगार कार्डधारकांना याचा लाभ मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. संजय पाटील यांच्या हस्ते …

Read More »

हलशी ते गुंडपी रस्त्याची दयनीय अवस्था

  खानापूर : हलशी ते गुंडपी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हलशी-गुंडपी रस्त्याची झाली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार मागणी करून देखील या रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल हलशी ते सरकारी मराठी शाळा हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याची दुरावस्था …

Read More »

भारत जोडो यात्रेसाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रवाना!

  बेळगाव : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहात निघाले आहेत. यावेळी अनेक वाहनांतून हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्साहाने निघाले …

Read More »

’अरिहंत’मध्ये इराकच्या बाळाला जीवदान!

  बेळगावात शस्त्रक्रिया : डॉ. एम. डी. दीक्षित यांना यश निपाणी (वार्ता) : अवघ्या दोन वर्षाच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच धक्का बसलेल्या पालकांनी सातासमुद्रापार इराकहून बेळगाव गाठले. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शखक्रिया करून त्या चिमुकल्याला जीवदान दिले. त्यासाठी बोरगाव येथील युवा उद्योजक …

Read More »

हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयाचा विभाजित निर्णय

  प्रकरण मुख्य न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरूवारी (ता. 13) हिजाब घालणे ही इस्लामची अत्यावश्यक प्रथा नाही या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या विद्यार्थ्यांच्या अपीलवर विभाजित निर्णय दिला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी अपील फेटाळले, तर सुधांशू धुलिया यांनी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवला. …

Read More »

उचगावात हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  उचगाव : येथील श्री मळेकरणी स्पोर्ट्सतर्फे आयोजित प्रकाशझोतातील खुल्या हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) झाले. ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार अध्यक्षस्थानी होते. तुरमुरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव, गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक प्रवीण देसाई, व्यवस्थापक सुधाकर करटे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाईक, कुमार लोहार, अशोक गोंधळी, बबलू सनदी, …

Read More »