Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

पात्रतेच्या आधारावरच पौरकार्मिकांना सेवेत करणार कायम : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेत पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. मात्र पात्रतेच्या आधारावर त्यांना सेवेत कायम करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासक नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगावात पौरकार्मिकांनी आजपासून सुरु केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यासाठी केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यभरात …

Read More »

बेळगावात पौरकार्मिकांचे ठिय्या आंदोलन व निदर्शने!

सेवासुरक्षा, घरे देण्याची मागणी बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सर्व 548 आणि भयकंत्रटी तत्वावर काम करणार्‍या 551 पौरकार्मिकांना सेवेत कायम करावे या व अन्य मागण्यांसाठी पौरकार्मिकांनी बेळगावात आज एल्गार पुकारला. शहरातील चन्नम्मा चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करून पौरकार्मिकांनी निदर्शने सुरु केली आहेत. बेळगावातील पौरकार्मिकांनी आपल्या मागण्यांसाठी इशारा दिल्याप्रमाणे आजपासून संप …

Read More »

जायन्ट्स प्राईड सहेलीतर्फे ‘पेपर स्प्रे‘ची निर्मिती

बेळगाव : जायन्ट्स प्राईड सहेलीची या वर्षीची थीम आहे ‘बी सेल्फ लेस‘ म्हणजे ‘स्वत:साठी जगा‘ स्वत:साठी जगताना स्वत:ची सुरक्षा पण महत्त्वाचे आहे. दररोज आपण पेपरमध्ये कुठे ना कुठे बायकांवर होणार्‍या अत्याचारांच्या बातम्या वाचतो आणि हळहळ व्यक्त करतो पण त्यासाठी आपण काही करू शकत नाही म्हणूनच प्राईड सहेली यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी …

Read More »

प्रा. गीता कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

बेळगाव : गुरु-शिष्य ही परंपरा चालत आलेली, गुरुवंदनेने ज्ञान प्राप्ती होते याची, प्रचिती पंडित नेहरू पदवी-पूर्व महाविद्यालयाच्या हिंदीच्या प्राध्यापिका श्रीमती गीता कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्ती समारंभात आली, असे गौरवोद्गार समाजसेविका श्रीमती शोभा लोकुर यांनी काढले. प्रारंभी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सौ. सारिका पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची …

Read More »

एलपीजी गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर आजपासून लागू होईल. या दर कपातीमुळे 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत 2,021 रुपयांवर आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. …

Read More »

रोहित शर्मा पुन्हा कर्णधार, टी-20 च्या इंग्लंड दौर्‍यासाठी भारताचा संघ जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौर्‍यावर असून सध्या कसोटी सामने सुरु आहेत. पण यामध्ये कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सामन्यांतून बाहेर झाला आहे. कसोटी सामन्यानंतर लगेचच म्हणजे 7 जुलै पासून दोन्ही संघामध्ये टी-20 सामने होणार असून यासाठी शर्माच कर्णधार असेल असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. पहिल्या टी-20 …

Read More »

नुपूर शर्माने देशाची माफी मागावी; सुप्रीम कोर्टाने फटकारलं!

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या …

Read More »

केरळमधील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला, सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

तिरुअनंतपुरम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सीपीआय(एम) मुख्यालयावर बॉम्ब फेकून दुचाकीस्वाराने पळ काढला. सीपीआय (एम) मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, तर गुरुवारी रात्री उशिरा कार्यालयात बॉम्ब फेकल्यानंतर सीपीआय कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जमले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद सीपीआय(एम) मुख्यालयावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी …

Read More »

गर्लगुंजी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

खानापूर : गर्लगुंजी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत बरगाव सीआरसी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ध्वजारोहनाने करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गर्लगुंजी मराठी मुलांची शालेचे सहशिक्षक श्री. संतोष चोपडे यांनी केले. चोपडे यांनी विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली. यावेळी ग्राम …

Read More »

जागतिक डॉक्टर दिन; डॉक्टरच खरे हिरो…

आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी …

Read More »