मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील दोन आरोपींनी बुधवारी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश …
Read More »मणिपूरमध्ये सहलीच्या बसला भीषण अपघात; १० विद्यार्थी ठार, १५ जखमी
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये आज एक अपघाताची घटना घडली. शाळेतील विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी बस पलटल्याने नऊ विद्यार्थिनींचा आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर असलेल्या लोंगराई परिसरातील ओल्ड कछार रोडवर झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीचे २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो. यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून महामेळावा रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन करण्याचा नारा दिला. यासंदर्भात आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्नाटक प्रशासनाने १९ …
Read More »मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई
बेळगाव – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शंकरप्पा आयोगाने शिफारशी लागू केल्या आहेत. सदर आयोगाच्या शिफारशी, परमनंट बॅकवर्ड कमिशनकडे पाठवण्यात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्न करत असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत बोलताना दिली. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, शून्य प्रहर काळात काँग्रेसचे आमदार आर. व्ही. देशपांडे …
Read More »सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान
पंकज पाटील : कोगनोळी येथे निषेध कोगनोळी : श्रीक्षेत्र सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केली आहे. पर्यटन स्थळ नसून पवित्र स्थान आहे. झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषणा केलेली ताबडतोब रद्द करावी अशी मागणी करत कोगनोळी व परिसरातील …
Read More »“कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शाहांसमोर खोटं बोलले, ते…”, जयंत पाटलांचा विधानसभेत मोठा दावा; फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर!
नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्वीट्सही चर्चेचा विषय ठरले होते. बेळगाव, कारवार, निपाणी आणि सीमाभागातील इतर गावांवर कर्नाटककडून दावा सांगितला जात आहे. शिवाय सांगलीच्या जतमधल्याही ४० गावांवर कर्नाटकनं दावा सांगितला आहे. या …
Read More »बोरगावमध्ये कडकडीत बंद
झारखंड सम्मेद शिखरजीचे पवित्रता जपा : केंद्र, राज्य सरकारकडे मागणी निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ करण्याच्या तयारीत झारखंड सरकार आहे. या निषेधार्थ बोरगाव येथे एका दिवशीय कडकडीत बंद पाळून दिगंबर जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२१) शहरातून रॅली काढण्यात आली. …
Read More »मराठा समाजाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : आ. श्रीमंत पाटील
बेळगाव : मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2ए प्रवर्गात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एक-दोन दिवसात याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. सुवर्णसौधमधील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बुधवारी एका खासगी हॉटेलात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, …
Read More »विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवसैनिक आक्रमक; पोलिसांनी कोल्हापुरातच अडवले
कोल्हापूर : कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील …
Read More »बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत, संजय राऊतांचं टीकास्र
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta