बेळगाव : बेळगाव शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली आहे. बिम्स आवारातील सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आमदार अनिल बेनेके यांनी आज मंगळवारी बिम्सचे संचालक ए. बी. पाटील यांच्यासह कंत्राटदार आणि …
Read More »सौंदलगा येथे जागतिक योगा दिन साजरा
सौंदलगा : सौंदलगा येथे जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौंदलगा ग्रामपंचायत मध्ये सचिव अश्पाक शेख यांनी सर्वांचे स्वागत करून आज ८ वा जागतिक योगा दिवस सौंदलगा ग्रामपंचायतीच्या वतीने साजरा करीत आहोत असे सांगितले. यानंतर प्रमोद ढेकळे यांनी सांगितले. की आहार-विहार, प्राणायाम यांचा हा व्यायाम आहे. योगा हा …
Read More »एकनाथ शिंदेंना हटवल्यानंतर अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेते!
मुंबई : आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांना हटविले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी त्यांनी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना घेऊन गुजरात गाठल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या धक्क्याने महाविकास आघाडीचे सरकारही धोक्यात …
Read More »योगसाधना करून स्वस्थ आणि मस्त रहा : आ. अंजली निंबाळकर
खानापूर : खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर आज आंतरराष्ट्रीय योगदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रत्येकाने योगसाधना करण्याचे आवाहन केले. खानापूर शहरातील मलप्रभा क्रीडांगणावर खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका प्रशासनाचे विविध अधिकारी, शिक्षक, शालेय विध्यार्थी आणि योगप्रेमींनी उपस्थित …
Read More »…हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न : शरद पवार
नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया देताना या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वननेस योगा चॅलेंज कार्यक्रम संपन्न
बेळगाव : वननेस योगा चॅलेंज हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य, आनंद आणि एकतेचा क्रांतिकारक मार्ग आहे. पंधरा जून पासून सात दिवसासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने जगभरातील साधकांसाठी आयोजित करण्यात आला होता. श्री प्रीताजी यांनी त्यांच्या अनुयायांना आणि लाखो साधकांना या योग प्रवासात सामील होण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून …
Read More »म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणी १३ जणांना केली अटक; १२ जणांच्या शोधासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकात पथके रवाना
मिरज : सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासगी सावकार …
Read More »एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे. पी. नड्डांची तातडीची बैठक!
नवी दिल्ली : राज्य सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेतील महत्त्वाचे नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेत मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असतानाच शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमवीर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात …
Read More »मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता, मोबाईल व व्हॉटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा …
Read More »खानापूरातील 35 कोटींच्या रस्त्याना मंजुरी
खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नाने 35 कोटींच्या रस्त्याना मंजुरी मिळाली आहे. तर अजून 10 कोटींचे रस्ते ग्रामीण विकास खात्याकडून येत्या आठ ते दहा दिवसांत मंजूर करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुक्यासाठी 20 कोटींचे पीडब्लूडी रस्ते व 5 कोटींचे पीआरइडीचे रस्ते असे एकूण 25 कोटी कर्नाटक सरकार कडून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta