Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

संकेश्वरात श्री महालक्ष्मी देवीची विशेष पूजा..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरात आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फ कुंकूमार्चन, देवीची विशेष पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सौ. महादेवी पाटील (देसाई), महेश देसाई दांपत्याच्या हस्ते श्री लक्ष्मी देवीची विशेष पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला उद्देशून बोलताना सौ. …

Read More »

राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे उद्या कर्नाटकात आगमन

स्वागताची जोरदार तयारी बंगळूर : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जोश जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो पदयात्रेचा उद्या (ता. ३०) राज्यात प्रवेश होणार आहे. त्यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याची तयारी करण्यात आली असून लोक मोठ्या संख्येने त्यांच्या …

Read More »

श्री दुर्गामाता दौडचे नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचेकडून स्वागत

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गुरुवार दि. २९ रोजी श्री दुर्गामाता दौडचे अंकले रस्ता येथे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात आले. श्री शंकराचार्य संस्थान यापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के तर कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस

  पन्नास टक्के वेतनवाढ : अमित कोरे यांची माहिती अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व रोजंदारी करमाऱ्या कर्मचाऱ्यांसह उद्योजक व्यावहारिक व मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामीण भागात सहकारी संस्थानच्या माध्यमातून देण्यात येणारे आर्थिक साहाय्य त्यामुळेच त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले असून त्याचबरोबरच सहकारी संस्थेच्या विकासासाठी गेल्या 34 वर्षांपासून सहकार क्षेत्रात …

Read More »

हरवलेल्या मानसिक युवकाला दिला मदतीचा हात

  बेळगाव : केस कापण्यासाठी गेलेला धामणे जवळील मास्केनट्टी या गावातील फकीरप्पा पाटील हा 36 वर्षीय युवक गावातून दिवसभर फिरत फिरत रात्री अनगोळ येथे फिरताना आढळून आला. त्याला पाहून तेथील युवकांनी त्याची चौकशी केली व त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने पाहून त्यांनी टिळकवाडी पोलीस स्टेशनला कळवले. युवकाची मानसिक स्थिती लक्षात …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागात विकास क्रांती घडवली : चन्नराज हट्टीहोळी

  बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेल्या साडेचार वर्षात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची क्रांती घडवून आणली असून, आगामी काळात विकासाला गती देणार असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. पंत बाळेकुंद्री गावातील बालमुकुंद कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुदानातून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार होण्यापूर्वी …

Read More »

संकेश्वर श्री गजानन सौहार्द अध्यक्षपदी दिपक कुलकर्णी

  तर उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिपक व्ही. कुलकर्णी, उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश बी. कुलकर्णी यांची उर्वरित कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. डी. लक्षाणी यांनी काम पाहिले. संस्थेचे दिवंगत चेअरमन डी. …

Read More »

अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

  नवी दिल्ली : गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. याच निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराविषयीही मत नोंदवलं आहे. महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा …

Read More »

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार!

  नवी दिल्ली : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला …

Read More »

आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिध्दनाथ यात्रा 11 ऑक्टोंबरपासून

कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (तालुका निपाणी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाच दिवशीय यात्रा मंगळवार तारीख 11 ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेनिमित्त तारीख 11 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार तारीख 11 रोजी सकाळी श्रींची पालखी …

Read More »