Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

भाजपाविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन

बेळगाव : भाजपा सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि सरकारने वाढवलेल्या महागाईविरुद्ध आज युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रारंभी संचयनी सर्कल येथील हनुमानच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा विरोध केला. तसेच ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या केल्याप्रकरणी …

Read More »

शिव-बसव जयंती, ईद शांततेने पार पाडा : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती, जगदज्योती श्री बसवेश्वर जयंती आणि मुस्लिमांचं पवित्र रमजान ईद शांततेने सौहार्दपूर्वक निश्चितच पार पाडली जाईल, असे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित शांतता कमिटीच्या सभेला उद्देशून बोलत होते. सभेच्या …

Read More »

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पीव्ही सिंधुची उपांत्यफेरीत धडक

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आपला दमदार फॉर्म कायम ठेवत महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारलीय. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या सिंधुनं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हि बिंग जियाओला पराभूत केलं. हि बिंग जियाओ विरुद्ध पीव्ही सिंधुनं 21-9, 13-21, 21-19 असा विजय …

Read More »

चंदन चोरांना फाशी देण्यात यावी : कृष्णा शितोळे

निपाणी : चंदन शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळते. एका लिटर तेलाचा दर तीन ते चार लाख रुपये आहे त्यामुळे चंदनाची चोरी केली जाते म्हणून चंदन चोरांना फाशी देण्यात यावी, असे मत निपाणी हुडको कॉलनीमधील कृष्णा शितोळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात चंदन शेती सेमिनार …

Read More »

अमृत योजनेअंतर्गत 65 गावातून राबविली जाणार विकासकामे

बेळगाव : तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीची निवड अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे 65 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात रस्ते सौरदिवे शुद्ध पाणीपुरवठा डिजिटल ग्रंथालय उद्यान सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आदींचा विकास केला जाणार आहे. तसेच या अंतर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये भूजल आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य …

Read More »

भिवशी येथे अंगणवाडी खोल्यांचा भूमीपूजन शुभारंभ

सौंदलगा : भिवशी येथे दोन अंगणवाडी खोल्यांचा भूमीपूजन शुभारंभ आशा ज्योती विशेष मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर. बी. मगदुम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा पंचायती फंडातून या अंगणवाडी मंजूर झाल्या असून यातील …

Read More »

घोटगाळी ग्रामपंचायतीवर जनतेचा घेराव

खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या कामकाजात सुव्यवस्थितपणा नाही. कामकाजात गैरप्रकार होत असल्याचा दावा करत घोटगाळी परिसरातील नागरिकांनी पंचायतीला जाब विचारण्यासाठी नुकताच घेराव घातला. यावेळी सदस्यांकडून झालेला गैरकारभारासंदर्भात विचारणा करताच ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, सदस्य लोकांना समर्पक उत्तरे देण्यास अयशस्वी ठरले आणि लागलीच तेथून काढता पाय घेतला. …

Read More »

वादळी पावसामुळे हलशी-बिडी रस्त्यावर विद्युत खांब कोलमडले!

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच झालेल्या पावसामुळे खानापूर तालुक्यातील हलशी-बिडी महामार्गावर 47 विद्युत खांब मोडून पडले आहेत. याबाबत माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून खानापूर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यातील हलशी-बिडी महामार्गावर या वादळी पावसामुळे झाडे उन्मळुन पडली. काही भागात झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यामुळे याभागातील उच्चदाबाच्या विद्युत वाहिनींचे 17 …

Read More »

पीएसआय भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्याला अटक

पुणे : कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीनं पुण्यातून ही अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पुण्यात लपून बसली होती आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी …

Read More »

कोल्हापूर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला, सोलापुरातील महिलेला रंगेहाथ पकडले

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणार्‍या सोलापूर येथील एका सराईत महिलेला जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून आज (शुक्रवार) सकाळी पकडले. सविता गोविंद अवतळे (वय 36, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. …

Read More »