Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

पत्नीची हत्या करून मृतदेह पलंगाखाली लपवून पतीचे पलायन!

  बेळगाव : तीन दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कमलादिनी येथे एका पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवून आणि मोबाईल फोन बंद करून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी आकाश कुंभार (२०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. चार महिन्यांपूर्वी आकाशशी लग्न करणाऱ्या साक्षीला हुंडा आणण्यासाठी …

Read More »

ऊस दरासाठी रयत संघाचे हारूगिरीत शुक्रवारी आंदोलन

  बेळगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात यावा असा आदेश सरकारने जारी केला असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा दर 5500 रुपये इतका घोषित करावा, या मागणीसाठी येत्या शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी हारुगिरी क्रॉस येथे कर्नाटक राज्य रयत संघ आणि …

Read More »

दिवाळीच्या तोंडावर ‘सोने’ महागले; २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर तब्बल रू १,२५,०००

  सर्वसामान्यांना फटका : लग्नसराईत बजेट कोलमडणारं बेळगाव (प्रतिनिधी) : महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. साधारणपणे १७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होईल आणि या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र …

Read More »

पाकाळणी कार्यक्रमाने बाबा महाराज समाधीस अभिषेक घालून निपाणी उरुसाची सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री. महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब(क. स्व) यांचा उरूस उत्सव शांततेत पार पडला. बुधवारी (ता.८) चव्हाण वाड्यातून चव्हाण वारस श्रीमंत रणजित देसाई -सरकार, श्रीमंत संग्राम देसाई -सरकार, श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह आणि बाहेरील …

Read More »

सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध

  खानापूर : सरन्यायाधीशांवर जोडे फेकण्याच्या निंदनीय घटनेचा खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या संदर्भात खानापूर तहसीलदारांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. दिल्ली येथील वकील राकेश किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य सरन्यायाधीश माननीय श्री. बी. आर. गवई यांच्या दिशेने पायातील जोडे …

Read More »

समर्थ नगर येथे महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

  बेळगाव : समर्थ नगर परिसरात आज सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सदर महिला घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता विहिरीजवळ चप्पल आढळल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती …

Read More »

मौजे किणये येथे 26 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा

  बेळगाव : खास दीपावलीनिमित्त मौजे किणये (ता. जि. बेळगाव) येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री गणराया बी. सी. ग्रुप किणये यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगाव व कोल्हापूर जिल्हा मर्यादित भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मौजे किणये येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, श्री गणेश …

Read More »

हायटेक बसस्थानकावरील मराठी ‘निपाणी’ शब्द गाळला!

  मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी ; कन्नड सक्तीचा जोर कायम निपाणी (वार्ता) : कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या निपाणी शहरातील हायटेक बसस्थानकावर मराठी फलक पुन्हा एकदा गायब झाला असून मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जुन्या बसस्थानक इमारतीवर मराठीत ‘निपाणी’ असे नाव ठळक अक्षरात लिहिले होते. मात्र, नवीन हायटेक बसस्थानक निर्मितीवेळी …

Read More »

पतीच्या अंगावर उकळते तेल ओतलेल्या पत्नीला अटक

  बेळगाव : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मच्छे येथे ही घटना घडली. यामध्ये पती 40 टक्के भाजला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुभाष हणमंतगौडा पाटील (वय 52, रा. रामनगर, मच्छे) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी वैशाली सुभाष …

Read More »

शहापूर विठ्ठल मंदिरात कीर्तन, गायन कार्यक्रम….

  बेळगाव : डॉ. रामचंद्र भागवत, लखनौ, यांचा कीर्तन व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील श्री विठ्ठल मंदीर (जुने) येथे आयोजित करण्यात आला आहे. कीर्तन शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता कीर्तन आणि रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला …

Read More »