Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशांत पाटील विशेष पुरस्काराने सन्मानित

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डॉक्टर, उद्योजक, समाजिक कार्य करणार्‍या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लॉन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत ऊर्फ उदय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उल्लेखनीय कार्याची …

Read More »

पीएसआय पित्याच्या अनैतिक संबंधांची चौकशी करणार्‍या युवकावरच पोलिसांचा प्राणघातक हल्ला

बेळगाव : पीएसआय पित्याच्या अनैतिक संबंधांची चौकशी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. पित्याच्या, प्रेयसीच्या सांगण्यावरून 3 पोलिसांनी या युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. राहुल सिद्दप्पा कर्णींग असे या घटनेतील दुर्दैवी गंभीर जखमी युव्हीलचे नाव आहे. त्याचे …

Read More »

बेळवट्टी येथे गणेश मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात

बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील श्री गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या मुख्य उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष डी. एन. देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष बी. देसाई, कृष्णकांत बिर्जे, बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक …

Read More »

माणगांव आगारातर्फे लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

माणगांव (नरेश पाटील) : दि. 01 जून रोजी महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ 74 वर्धापन दिन तसेच 75 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षाबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम आगार व्यवस्थापक रा.प. माणगांवचे चेतन मुकुंद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चा.) माने, विभा. भांडार अधिकारी नाळे, …

Read More »

जगदंब दुचाकी मोटर्सचे शानदार उद्घाटन

माणगांव (नरेश पाटील) : शहरात मोर्बा रोड येतील कोकण बाझारच्या समोर जगदंब मोटर्स या नव्या दुचाकी शोरूमचे उद्घाटन रविवार दि. 29 मे रोजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वॉर्डातील सदस्य तथा न. पं. चे घटनेते प्रशांत साबळे त्याच बरोबर नितीन बामगुडे, संदीप करंगटे, अमोल मोने, पोलीस …

Read More »

राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या क्रीडापटूला कांस्य

बेळगाव : झारखंड येथील रांची येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून बेळगावमधील लक्ष्मी पाटील या क्रीडापटूने बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा बस्तवाड या गावातील कुमारी लक्ष्मी संजय पाटील या क्रीडापटूने कुस्ती स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले आहे. रांची येथे झालेल्या …

Read More »

कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा

कोगनोळी : शिक्षक व पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार फेरी बुधवारी दुपारी नुकतीच संपन्न झाली. येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व पदवीधरांना उमेदवार अरुण शहापूर व हनुमंत निराणी यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन विक्रमी मतांनी निवडून …

Read More »

म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च; गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम

नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. तर पोलिसांनी गोविंदानंद सरस्वती यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक …

Read More »

मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. …

Read More »

केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत.” असं म्हणत …

Read More »