संभाजी ब्रिगेडच्या गिरगाव कोव्हीड सेंटरमुळे रुग्णांमध्ये नवी ऊर्जाकालकुंद्री (वार्ताहर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण, नेते, खेळाडू, शरीरसौष्ठवपटू, पैलवान (घाबरून?) बळी पडत असताना एका ८५ वर्षांच्या आजीने या धोकादायक कोरोनाला चितपट केलंय. हे आश्चर्य घडलंय संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोल्हापूर नजीकच्या गिरगाव- पाचगाव सेंटरमध्ये. कोल्हापूर शहरातील …
Read More »भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अखेर रद्द
मुंबई -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-20 सामन्यांची मालिका बीसीसीआयने अखेर रद्द केल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर ही मालिका होणार होती. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यासाठी विंडो मिळावी, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. बायोबबलचे संरक्षण असूनही अनेक खेळाडू आणि कर्मचारी वर्गाला आयपीएलदरम्यान करोनाची …
Read More »न्यूझीलंड संघाच्या सरावाला परवानगी
लंडन -भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाला विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे सरावाला परवानगी दिली आहे. येत्या 18 जूनपासून हा सामना सुरू होत असून, या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते भारताविरुद्ध 18 ते 22 …
Read More »कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आकांक्षा’ पोर्टलचे अनावरण
बेंगळूर : कर्नाटकच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडक ग्रामपंचायतींसह अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यांनतर कोरोना संकटात योगदान देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक सोपा व्हावा यासाठी नियोजन खात्याने ‘आकांक्षा’ पोर्टल सुरु केले आहे. बुधवारी मुख्यमंत्री बी. …
Read More »सुरु केली विनामूल्य रुग्णवाहिका सेवा
बेंगळूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बऱ्याच वेळेला रुग्णांना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, बुधवारी कर्नाटक काँग्रेसच्या वतीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक युवा कॉंग्रेस कमिटीच्या पुढाकाराने काँग्रेसने कोडगू, शिमोगा आणि चिकमंगळूर येथील नागरिकांसाठी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे …
Read More »निपाणीत ’रेमडेसिव्हिर’चा तुटवडा!
कसे लढणार कोरोनाशी : रुग्णांचा प्राण कंठाशी निपाणी : विषाणूजन्य आजारांवर गुणकारी ठरलेल्या ’रेमडेसिव्हीर’ या इंजेक्शनची सर्वत्र मोठी मागणी असल्याने निपाणी शहरात अनेक दिवसांपासून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही खासगी रुग्णालयांनी हात वर करीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती चिठ्या सोपविल्या आहेत. औषध आणल्यावर इलाज, अशी भूमिका घेतल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण कंठाशी …
Read More »’खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली!
निपाणी पोलिसांनी केली कोरोनाच्या दुसर्या लाटेवर मात : व्यायामावर केले लक्ष केंद्रित निपाणी : योग्य नियोजनामुळे निपाणी पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणामी, कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकाही पोलिसाला प्राण गमवावे लागले नाहीत. यावरून पहिल्या लाटेनंतर आलेल्या अनुभवातून घेतलेल्या खबरदारीमुळे पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती बर्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. निपाणी …
Read More »कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन
बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा …
Read More »बुध्दपोर्णिमा : कोरोना संकटात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : बुध्दपोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, कोरोना संकट काळात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार आहे. निसर्गाचा आदर करणं, ही बुध्दांनी दिलेली शिकवण महत्वाची आहे. बुध्दांची तत्वे दीपस्तंभासारखे आहेत. कोरोनामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आज संपूर्ण देश संकटात आहे. या काळामध्ये …
Read More »बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करा : खानापूर युवा समिती
बेळगाव : खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली, माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे तहसीलदार रेश्मा …
Read More »