Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

बेंगळुरू : सहा शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

बेंगळुरू : शहरातील सहा शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, धमकीचा मेल मिळाल्यानंतर बॉम्बविरोधी पथकाने संबंधित शाळांमध्ये तपास सुरू केला आहे. शहरातील सहा शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या असून, पोलिसांचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत, अशी माहिती बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे. मिळालेल्या …

Read More »

भीमराव जनवाडे यांचे मृत्यूनंतर देहदान!

वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द : देहदानाची बेनाडीतील पहिलीच घटना निपाणी (वार्ता): बेनाडीतील ज्येष्ठ नागरिक निवृत्त शिक्षक भीमराव संभाजी जनवाडे यांचे गुरुवारी (ता.७) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदानाचा संकल्प त्यांनी केला होता. त्यानुसार त्यांचा मृत्यूदेह बेळगाव येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयांकडे सुपूर्द करण्यात आला. भीमराव संभाजी जनवाडे (वय ७२) …

Read More »

देवदादा सासनकाठी जोतिबा डोंगराकडे रवाना

बेळगाव : दख्खनच्या राजा जोतिबा देवाची बेळगांवची मानाची इरप्पा देवदादा सासनकाठी वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाली. चव्हाट गल्लीतील देवघरातील देवाची विधिवत पूजा करून दीडशेहून अधिक नागरिक मानाच्या कटल्यासह बैलगाड्यामधुन कोल्हापूर येथील जोतिबा चैत्र यात्रेसाठी रवाना झाले. यावेळी बेळगाव (चव्हाट गल्ली, देवदादा सासनकाठी) येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न शहरातील चव्हाट …

Read More »

धावड काम करता करता मुलाचा शाळेचा अभ्यास घेणारी पाटणे फाट्यावरील माता; बापूसाहेब शिरगावकरानी दिला मदतीचा हात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आज दुपारी पाटणे फाट्यावरुन घरी येत असताना कृष्णा ऑईल मिलच्या समोर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे धावड काम करणार्‍या झोपडीकडे बापूसाहेब शिरगावकर, जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय मानवाधिकार संघटन यांचे अचानक लक्ष गेले. समोरील दृष्य पाहून त्यांचा गाडीचे ब्रेक आपोआप दाबले गेले. समोर दृष्य होते ते …

Read More »

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार शक्य

मुख्यमंत्री बोम्मई, कार्यकारिणीच्या बैठकीला नड्डांची उपस्थिती बंगळूर : कर्नाटकमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीची तारीख निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या दिल्ली भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा …

Read More »

दिवंगत मित्राच्या वाढदिनी जीवनावश्यक वस्तूचे वाटप

चाँदशिरदवाड मोरया ग्रुपचा उपक्रम : वीट भट्टीवरील मजुरांना दिलासा निपाणी (विनायक पाटील) : चाँदशिरदवाड (ता. निपाणी) येथील मोरया ग्रुपचा सक्रीय कार्यकर्ता व अनेक मित्रांचा जिवलग असलेला रजत नलवडे यांचा गेल्या वर्षी कोरोना काळात मृत्यू झाला. हा मृत्यू नलवडे कुटुंबिय व सर्व मित्रांच्या जिव्हारी लागला. एक सच्चा दिलदार मित्र ऐन तारुण्यात …

Read More »

सैनिकी शाळेमध्ये अंकित उपाध्ये यांचा सत्कार

कोगनोळी : इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज कोगनोळी या सैनिकी निवासी संकुलामध्ये डॉक्टर अंकित उपाध्ये यांचा सत्कार केला. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ज्योतिष शास्त्रामध्ये पीएचडी तसेच ज्योतिष शास्त्र विशारद म्हणून नाव लौकिक मिळवल्याबद्दल संकुलाच्या अध्यक्षा रेखा पाटील व संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते …

Read More »

बेनाडी येथे उद्यापासून बिरदेव यात्रा

धनगरी गीत गायन स्पर्धा : विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव यात्रा आणि बिरदेव देवस्थान यात्रा कमिटी तर्फे शनिवारपासून (ता.9) सोमवार अखेर (ता.11) बिरदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व धनगरी ओव्या च्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी(ता.9) रात्री …

Read More »

तोपिनकट्टीत गणेशमुर्तीला अभिषेक घालुन प्राणप्रतिष्ठापनेचा २०वा वर्धापनदिन सोहळा साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता खानापूर) येथे शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीला ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. गीता अप्पाजी हलगेकर याच्या हस्ते अभिषेक घालुन प्राणप्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव गुरव उपस्थित होते. तर दीपप्रज्वलन श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, मल्लेशी खांबले, …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाची रविवारी बैठक

बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने शिवप्रेमी उत्साह संचारला आहे. रामलिंग खिंड गल्ली …

Read More »