Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भासाठी माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार 15 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असल्यास त्यांना त्यांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार बेळगांव शहरात 22 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक राहतात. त्यांना सरकारी परिपत्रके मराठीतून द्यावीत त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर मराठी बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी महापौर …

Read More »

खानापूरात मॅरेथॉन स्पर्धकांसाठी अकॅडमी

  देशभरातून विविध राज्यातील धावपटू खानापुरात दाखल जगदीश शिंदे यांची धडपड खानापूर : मॅरेथॉन क्रॉस कंट्री व इतर दीर्घ पल्ल्याच्या स्पर्धेतील धावपटूंना प्रशिक्षण देऊन आंतराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम स्पर्धक तयार करणे या एकमेव उद्देशाने खानापूर शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन करण्यात आली असून आत्तापर्यंत हरियाणा, उत्तरप्रदेश, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग; होरपळून पाच जणांचा मृत्यू, सातजण जखमी

  मोरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर …

Read More »

प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; भाजपाचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक

  हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने …

Read More »

सामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी ’ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करा!

  श्री. पुरुषोत्तम सोमानी यांची केंद्र सरकारकडे मागणी औषधांचे अधिकतम मूल्य (एम.आर.पी.) जास्त असावे, यासाठी घाऊक औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेते यांचा औषधनिर्मिती आणि विक्री करणार्या फार्मा कंपन्यांवर मोठा दवाब आहे. तसेच रूग्णालये, डॉक्टर्स आदींचाही या साखळीत असणारा सहभाग आणि ‘एम.आर.पी.’ यांवर केंद्र शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे औषधे मनमानी …

Read More »

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र!

  मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचेही …

Read More »

निपाणीत संत सेना महाराज पुण्यतिथी

  निपाणी (वार्ता) : वारकरी संप्रदायातील महान संत शिरोमणी श्री सेना महाराज यांची पुण्यतिथी रोजी येथील साखरवाडी मधील संत सेना भावनात करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. संत सेना महाराज पालखी व भजनी मंडळाच्या मिरवणुकीने पुण्यतिथीची सुरुवात करण्यात आली. पालखी श्री संत सेना भवन ते सटवाई रोड नरवीर तानाजी चौक …

Read More »

निपाणीत रिंगण सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे

  श्रीमंत दादाराजे देसाई सरकार : रविवारी होणार सोहळा निपाणी (वार्ता) : शहर व परिसरासाठी प्रथमच भव्य प्रमाणात होत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाच्या गोल व उभे रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर रविवारी (ता.28) होणार्‍या या सोहळ्यात शहर व परिसरातील 50 हून अधिक …

Read More »

शांतिनिकेतन स्कूलतर्फे उद्या खानापुरात मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर (विनायक कुंभार) : स्वातंत्र्योत्सवाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शांतिनिकेतन सीबीएससी पब्लिक स्कूलच्या वतीने शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी सकाळी 7 वा. शांतिनिकेतन स्कूलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुला-मुलींसाठी असलेली ही स्पर्धा तीन गटामध्ये होणार असून 14 वर्षाखालील स्पर्धकांसाठी 3 कि.मी. अंतर …

Read More »

गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडले आहे. 16 ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर …

Read More »