कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख. या गल्लीत नगरप्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. गुजरीच्या या गल्लीत पडत्या पावसाच्या शिडकाव्याचा मारा सहन करत रांगोळी कलावंतांचा उत्साह शिगेला …
Read More »दुर्गादेवी जत्तीमठ येथे माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते आरती संपन्न…
बेळगाव : दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ बेळगाव येथे नवरात्री उत्सव सोहळा उत्साहात खंडेअष्टमीच्या दिवशी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर देवीची ओटी भरून दर्शन घेतले तसेच आज देवीची आरती सुद्धा ताईंच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे गोंधळ लोककलेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने लोकसंस्कृती जपणारे वाद्यांच्या गजरात वेगवेगळी गीते …
Read More »संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर
बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी जेष्ठ नागरिक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक आणि समाजाला आदर्श असणाऱ्या क्रियाशील व्यक्तीमत्वांना संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी संगीत गुरू शंकर पाटील, नाट्य दिग्दर्शिका सुनिता पाटणकर आणि समाजसेविका कवियत्री स्मिता पाटील यांना …
Read More »“जय किसान”च्या व्यापाऱ्यांसाठी एपीएमसीमध्ये जागा उपलब्ध करून देणार
बेळगाव : सरकारी नियमानुसार ‘जय किसान’ सारख्या खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी देण्याची सरकार प्रणालीत कोणतीही तरतूद नाही. मात्र, ‘जय किसान’च्या सर्व व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगाव शहरात आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते …
Read More »नवरात्रोत्सवानिमित्त निपाणीत विविध मंडळातर्फे गरबा दांडियाचा जल्लोष
निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहरात दांडिया-गरब्याचा जल्लोष रंगात सुरू आहे. तरुणाई उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे. शहरातील प्रमुख मंडळे व क्लबतर्फे आकर्षक मंडप, रोषणाई व सजावट करून दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात गरबा, दांडियाची रंगत वाढत आहे. या विविध समाजातील तरुणाई …
Read More »सततच्या पावसाने झेंडूचा झाला खराटा
फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातून फुलशेती करणारे शेतकरीही सुटलेले नाहीत. चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेवंती, गुलाब, झेंडूच्या झाडांचा दसऱ्यापूर्वीच खराटा झाला आहे. दसरा, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा झेंडू अतिवृष्टीने आडवा झाला आहे. त्यामुळे …
Read More »कुस्तीत सुयश मिळवलेल्या मुलींच्या संघाचे बेळगावात भव्य स्वागत
बेळगाव : म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धा आणि सीएम चषक कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून परतलेल्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या मुलींच्या संघाचे कडोली ग्रामस्थ आणि बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. म्हैसूर येथील देवराज कुस्ती आखाडा येथे गेल्या …
Read More »निपाणीतील कामगार निरीक्षक १० हजाराची लाच स्वीकारताना गजाआड
निपाणी (वार्ता) : निपाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर लोकायुक्त विभागाने कारवाई करून १० हजाराची लाच घेताना निपाणीतील कामगार कार्यालय निरीक्षक नागेश कळसण्णावर यांना रंगेहाथ पकडले. त्यांना लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यानी दिलेली माहिती अशी, बोरगांव येथील पानमसाला कारखान्याचे मालक राजू पाच्छापुरे यांच्या …
Read More »दसरा उत्सवासाठी पोलीस आयुक्तांना आमंत्रण!
बेळगाव : 2 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक बेळगावचा दसरा उत्सवा निमित्त बेळगावचे शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना आमंत्रण देण्यात आले. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला बेळगावचा दसरा उत्सव यंदाच्या वर्षी सुद्धा नियोजनबद्ध व शिस्तबद्धसाठी पार पडावा यासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून व शासनाच्या सहकार्याने प्रयत्न …
Read More »सरकारी नोकरीसाठी वयात ३ वर्षांची सूट
बंगळुर : राज्य सरकारने नोकरी शोधणाऱ्यांना दसऱ्याची बंपर भेट दिली आहे. सोमवारी नागरी सेवा पदांवर थेट भरतीसाठी वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करणारा एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने आज एक अधिकृत आदेश जारी केला आहे ज्यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागांद्वारे घेण्यात येणाऱ्या थेट भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta