Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटकातून राज्यसभेवर चारही उमेदवार बिनविरोध विधानसभा सचिवांची अधिकृत घोषणा

  बंगळूर : कर्नाटक विधानसभेतून १८ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली असून काँग्रेसचे तीन आणि भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर उरलेल्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी तथा विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी यांनी …

Read More »

सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी सावध राहा; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा

  बेळगाव : सोशल मीडियाचा गैरवापर करून प्रक्षोभक मजकूर, धमकीचे व्हिडिओ किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष सायबर सेलची स्थापना केली आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली. सायबर सेलची विशेष टीम सोशल मीडियावरील प्रक्षोभक पोस्ट, द्वेषपूर्ण संदेश तसेच ऑनलाइन माध्यमातून धमकीचे संवाद …

Read More »

नेत्रदान हे अत्यंत पवित्र व कल्याणाकारी कार्य : डॉ. शुभांगी पाटील

  जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने नेत्रदान जनजागृती बेळगाव : राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती दिनानिमित्त जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी पाटील यांनी विद्यार्थिनींना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाल्या की, नेत्रदान हे अत्यंत …

Read More »

मराठी भाषेसाठी म. ए. समितीचा 22 जून रोजी मोर्चा; पोलिस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कांशी कन्नडसक्ती रोखण्यासाठी २२ जून रोजी बेळगावात शांततापूर्ण मोर्चा म. ए. समितीचे काढण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक परवानगी देण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे …

Read More »

सार्व. वाचनालयातर्फे साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने

  बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे आज गुरुवारी साने गुरुजी यांचा 76 वा स्मृतिदिन गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

कुद्रेमानीतील लोहार बंधूंकडून श्री महालक्ष्मी देवीला सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण अर्पण

  कुद्रेमानी ( प्रतिनिधी) : कुद्रेमनी गावच्या ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेचे औचित्य साधून लोहार कुटुंबीयांनी भक्तिभावाने सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण देवीचरणी अर्पण केले. या धार्मिक व मंगलमय सोहळ्यामुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली. स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र व कुशल कारागिर भरमाणा अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार …

Read More »

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन; विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनाही पाठिंब्याचे पत्र

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा एकदा वेग देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलावण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला असून, या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. …

Read More »

अंमलझरी येथे धर्मस्थळ संस्थेतर्फे वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : धर्मस्थळ कृषी अभिरुद्धी संघाकडून अंमलझरी येथे विविध प्रकारची रोपे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी धर्मस्थळ कृषी अभिवृद्धी संघाचे कृषी अधिकारी व पदाधिकारी, आणि श्री रेणुका देवस्थान कमिटीतील संचालक व गावातील धर्मस्थळ संघातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या. रेणुका मंदिरच्या परिसरात तब्ब्ल २० आंबा, पेरू, लिंबू, सिताफळ, …

Read More »

श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेची 800 कोटी ठेवीकडे वाटचाल

  संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची माहिती : संस्थेच्या कार्याचा घेतला आढावा निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने 700 कोटी ठेवीचा टप्पा पार करून 800 कोटी ठेवीकडे, वाटचाल केली आहे. समाजाचे आर्थिक हित झोपायचे काम सुरू असल्याचे मत सहकाररत्न संस्थापक अध्यक्ष डॉ. …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने येत्या रविवारी दहावीच्या गुणवंतांचा सत्कार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये मराठी माध्यमात बेळगाव शहर,बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातून प्रत्येकी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न …

Read More »