Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड

Spread the love

 

खानापूर : कर्नाटक राज्य माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना बंगळूर यांच्या माध्यमीक शारिरीक शिक्षक संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कुल मणतुर्गा हायस्कुलचे शारिरीक शिक्षक श्री. किरण आर. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. किरण पाटील हे चन्नेवाडी गावचे सुपुत्र असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव असे कार्य आहे. अनेक तालुकास्तरीय तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये त्यांनी पंच व प्रशिक्षक म्हणून कार्य बजावलेले आहे, याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.

हि निवड करताना खानापूर तालुकाच्या पि. ई. ओ. सुरेखा मिर्जी तसेच बेळगाव जिल्हा कार्यदर्शी श्री. एल. एन. कुरेर , प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. सि. आर. भोसले, बेळगाव जिल्हा सरकारी ग्रेड वन अध्यक्ष श्री. बैलवाड, उमेश धबाले, एस. बी. अंबरगट्टी. एम.पि. निचनकी, ए. आर. पाटील ‘ सन्नार , पवार , श्री. सि. आर. तडकोड, सेवादल संचालक पत्तार हे उपस्थित होते. या निवडीनंतर किरण पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार तसेच अभिनंदन करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष सरकारी माध्यमिक शाळा हिरेमनोळीचे शारीरीक शिक्षक श्री. बि. के. पाटील यांचा पण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील शारीरीक शिक्षक व सि. आर. पि. उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *