बेळगाव : वाढत्या नागरीकरणामुळे सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेली हिरवाई पुन्हा फुलविण्यासाठी वन विभागाने यंदा प्रथमच जपानी ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात तब्बल दोन लाख रोपे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, घनदाट वनक्षेत्र उभारण्यासाठी प्रति एकर 14 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार …
Read More »सरकारी रुग्णालयांना मोठा दिलासा; 200 डॉक्टरांसह 1,200 निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची होणार भरती
बेळगाव : सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय यंत्रणा आणि रुग्णसेवेतील अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या घटना समोर येत असताना राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांसाठी 200 डॉक्टरांची कायमस्वरूपी थेट …
Read More »काँग्रेस पक्ष वाढीसाठी मंत्री जाकीहोळी यांचा लवकरच निपाणी भागाचा भागाचा दौरा
निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांची फेरनिवड होऊन शपथ घेतल्यानंतर भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर- पवार यांनी भेट घेतली व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी राजकीय चर्चा केली. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …
Read More »आमदार प्रकाश हुक्केरी यांची कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांची नवी दिल्लीत कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या विविध विकासकामांसाठी केंद्राकडून आवश्यक निधी, मंजुऱ्या आणि सहकार्य मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका …
Read More »शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर
कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी परतत असताना एका २५ वर्षीय तरुणावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश बाबू गावडे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे शेतातील काम पूर्ण करून …
Read More »रौडीशीटरांच्या घरांवर पोलिसांचा पहाटे छापा; ८.५ लाखांची रोकड, १० वाहने जप्त
बेळगाव : उत्तर विभागातील पोलिसांनी बुधवारी पहाटे बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय रौडीशीटरांच्या घरांवर एकाचवेळी धडक कारवाई करत मोठा छापा टाकला. या मोहिमेत एकूण ४५६ सक्रिय रौडीशीटरांच्या घरांची झडती घेण्यात आली. छापेमारीदरम्यान पोलिसांनी ८ लाख ५० हजार रुपयांची रोकड, नोंदणी क्रमांक आणि कागदपत्रे नसलेली …
Read More »खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा
बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषाला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली गाठली असून, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबत ते आज महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. राज्यातील खातेवाटपाचा वाद, नाराज मंत्र्यांच्या मागण्या तसेच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार या सर्व मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठींसोबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. …
Read More »मुलींच्या वसतिगृहात मद्यपार्टी; व्हिडिओ व्हायरल, चौकशीची मागणी
कलबुर्गी : जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील कडगंची येथील बीसीएम (BCM) महिला वसतिगृहात विद्यार्थिनींनी कथितरित्या मद्यपार्टी केल्याचा प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तसेच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी वसतिगृहाच्या खोलीत बसून मद्यसेवन करत …
Read More »जगबुडी नदीत पोहताना ४ सख्खे भाऊ बुडाले; तिघांचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड आणि भोस्ते गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका युवकाला सुखरूप वाचवण्यात यश आले असून, या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार …
Read More »पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ पाकिस्तान लष्कराच्या एव्हिएशन विंगचे Mi-17 हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्व 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta