बेळगाव : वडगाव परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवी यात्रोत्सवावर यंदा अधिक मासाचा प्रभाव पडला असून यात्रोत्सव तब्बल एक महिना उशिराने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी जुलै महिन्यात होणारा हा पारंपरिक उत्सव यंदा 11 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होणार आहे. हिंदू पंचांगानुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या …
Read More »मंत्रीपद नसले तरी जनतेचा विश्वास कायम; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जनता दर्शनाला मोठी गर्दी
बेळगाव : माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्ह्याच्या विविध भागांसह ग्रामीण आणि शहरी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. जमीन, महसूल, सामाजिक सुरक्षा योजना, महिला व बालकल्याण, पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण, …
Read More »हणमंतगौंड नगर येळ्ळूर येथे नवीन बस थांब्यासाठी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन
येळ्ळूर : हणमंतगौंड नगर, येळ्ळूर येथील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिसरात नवीन बस थांब्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला एक लेखी निवेदन माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रण अधिकारी के. एल. गुड्डण्णावर आणि के एस आर टी सी अधिकारी …
Read More »20 वर्षांपासून बससेवेपासून वंचित गावांसाठी बस सुरू करण्याची मागणी; दलित संघर्ष समितीचे डेपो व्यवस्थापकांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरपाई, माचाळी आणि घार्ली या गावांना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) यांच्या वतीने खानापूर येथील NWKSRTC बस डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप …
Read More »कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये संगणक शिक्षणाला चालना; 2,500 आयटी शिक्षकांची भरती
बेळगाव : डिजिटल युगातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने शालेय स्तरावर संगणक शिक्षणाला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी ते सक्षम व्हावेत, या उद्देशाने राज्यातील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये (केपीएस) संगणक शिक्षणाची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल …
Read More »रेशनधारकांना मोठा दिलासा! जूनपासून एकदाच बायोमेट्रिक, धान्य वितरण होणार सुलभ
बेळगाव : मागील महिन्यात रेशन मिळवण्यासाठी दोनदा बायोमेट्रिक करण्याच्या सक्तीमुळे रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. सर्व्हर डाऊन, बोटांचे ठसे न उमटणे आणि वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता जून महिन्यात रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, एकदाच बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य …
Read More »बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा
खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे …
Read More »सराफ कॉलनीतील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपले; नागरिकांमध्ये संताप
बेळगाव : अजंटा हॉटेलच्या पाठीमागील सराफ कॉलनी परिसरात ड्रेनेजच्या गळतीमुळे सहा उघड्या विहिरी आणि एका बोअरवेलमधील पाणी दूषित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही ड्रेनेज मॅनहोलमधून सांडपाण्याची गळती होत असल्याने …
Read More »मोदगे येथे सर्पमित्राने दिले सापाचा जीवदान
दड्डी : मोदगे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्र धनंजय पाटील यांच्या तत्परतेमुळे सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले. मोदगे येथील आन्नाप्पा पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना अचानक साप दिसून आला. साप पाहताच …
Read More »श्रीमंताऐवजी सर्वसामान्यांना घरकुले द्या; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे
शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दि. २० मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta