Sunday , September 20 2026
Breaking News

जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सीआयडी येथे झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. क्रेडाई बेळगावने कर्नाटकात प्रथमच एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबत असा सामंजस्य करार केला असून, हा उपक्रम राज्यातील पहिलाच असल्याचे सांगण्यात आले.

क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी सांगितले की, या कराराचा उद्देश जीआयटी मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय, बिल्डरशिप, कन्सल्टिंग इंजिनिअर, आर्किटेक्चर आणि बांधकाम क्षेत्रातील विविध करिअर संधींसाठी सक्षम बनविणे हा आहे.

या करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दोन आणि चार महिन्यांचे विशेष इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम उद्योगातील अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये मिळणार असून, उद्योग क्षेत्रातील गरजेनुसार त्यांना तयार केले जाणार आहे.
या प्रसंगी गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राज बेळगावकर, संस्थेचे राम भंडारी, आर. एस. मुतालिक, ऍड. व्ही. एस गणाचारी तसेच क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, प्रशांत वांडकर, आनंद कुलकर्णी आणि विरेश शेट्टनावर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *