Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सर्व नवनिर्वाचित संचालकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रवीण रंगोले यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक शांततेत पूर्ण झाली.

व्यापारी क्षेत्रातील आजीवन सभासद म्हणून संजय डब्ल्यू. पोतदार, राजेंद्र वाय. मुतगेकर, विक्रमकुमार जैन, वैभव शांताराम वर्णेकर आणि नितीन पारसमल पोरवाल यांची बिनविरोध निवड झाली. तर व्यापारी क्षेत्रातील सर्वसाधारण सभासद म्हणून सुधीर धर्मप्पा चौगुले यांची निवड करण्यात आली.

औद्योगिक क्षेत्रातील आजीवन सभासद म्हणून सतीश जी. कुलकर्णी, आनंद माणिक देसाई आणि अशोक लक्ष्मण कोळी यांची निवड झाली. तसेच औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण सभासद म्हणून बसवराज राम्पुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन संचालक मंडळाच्या निवडीमुळे चेंबर ऑफ कॉमर्सच्या आगामी कार्यकाळात व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *