Sunday , September 20 2026
Breaking News

भारतनगर पंच कमिटीची निवड; महादेव तुकाराम पाटील सरपंचपदी

Spread the love

 

बेळगाव : भारतनगर पहिली गल्ली, शहापूर येथील पंच कमिटीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये गल्लीतील ज्येष्ठत्वानुसार ज्येष्ठ नागरिक  श्री. महादेव तुकाराम पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

तसेच सेक्रेटरीपदी श्री. विजय वांगणेकर, तर खजिनदारपदी श्री. प्रभाकर मारुती अष्टेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. संतोष नारायण कणुकले, श्री. अनिल तानाजी पाटील (विवेकानंद), श्री. किरण प्रकाश हुद्दार, श्री. राजू मारुती अष्टेकर, श्री. नारायण दत्तात्रय बामणे, श्री. गणेश प्रभाकर देसुरकर, श्री. बंडू शांतिनाथ सामजी आणि श्री. राजू जयपाल संकन्नावर यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पंच कमिटीची कार्यकारिणी 2026 ते 2029 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित नागरिक व पंच कमिटी सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *