Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

बैलाऐवजी पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू; लातूरमधील शेतकऱ्याची हृदयद्रावक परिस्थिती

  लातूर : देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघर्षाचे आणखी एक विदारक उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात समोर आले आहे. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने एका शेतकऱ्याने पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू ठेवून शेत नांगरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील देओणी तालुक्यातील …

Read More »

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वडगाव येथे रविवार, १४ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर

  बेळगाव : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ (सोनार गल्ली, दत्त गल्ली, पटवर्धन लेआऊट, मा. वडगाव, बेळगाव) यांच्यावतीने रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संकलित केले जाणारे रक्त ‘श्री महावीर ब्लड बँक, बेळगाव’ यांच्यातर्फे संकलित (रक्त संकलन) …

Read More »

भरधाव स्कॉर्पिओ झाडाला धडकली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर

  रांची : झारखंडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लोहरदगा जिल्ह्यातील एका कुटुंबाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम मुस्तफा (वय ५८) हे …

Read More »

सीमावासियांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका खूप खूप सोसलं… आता आमच्या आंदोलनाला समर्थ साथ द्या!

  “माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया कायली…” या मराठी भावगीताच्या ओळी आजही सीमा भागातील प्रत्येक मराठी बांधवाच्या वेदना व्यक्त करतात. महाराष्ट्रापासून तुटले गेल्याची सल, न्यायासाठीचा सात दशकांचा संघर्ष आणि आपल्या मातृभूमीत सामावून घेण्याची आस आजही तितकीच तीव्र आहे. रामाचा वनवास चौदा वर्षांनी संपला; मात्र बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचा …

Read More »

जागतिक बालमजुरी विरोधी दिन विशेष : बालपणाच्या हातात पुस्तके द्या, मजुरीची ओझी नाही!

  “मूल म्हणजे मातीचा गोळा… आकार द्यावा तशी मूर्ती घडते.” बालपण हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर उभे राहते ते निरागस हास्य, स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आनंदाने बागडणारे कोवळे आयुष्य. पण समाजातील प्रत्येक मुलाच्या वाट्याला असे सुंदर बालपण येतेच असे नाही. अनेकांचे बालपण गरिबी, उपासमार आणि मजुरीच्या ओझ्याखाली चिरडले जाते. …

Read More »

हब्बनहट्टी खनिज वाहतूक प्रकरण तापले; विविध विभागांच्या भूमिकेवर संशय, चौकशीची मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी परिसरात सुरू असलेल्या खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि संबंधित शासकीय विभागांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही …

Read More »

मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी मजगावमध्ये जनजागृतीची हाक; विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

  बेळगाव : जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढता कल पाहायला मिळत असताना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी शाळांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी मजगाव येथील मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. ३५ च्या वतीने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात …

Read More »

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ; बेळगावात 119 पैकी केवळ 67 प्रवेश निश्चित

  बेळगाव : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खाजगी व अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. मात्र यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसून पालकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. बदलती नियमावली, ऑनलाइन …

Read More »

कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांचे काव्यवाचन शनिवारी

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने राबविण्यात येत असलेल्या “कवी समजून घेताना” या उपक्रमांतर्गत शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावतर्फे सातवे पुष्प म्हणून ‘स्वरूपायन’ या विशेष काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवयित्री प्रा. स्वरूपा इनामदार यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात येणार असून हा …

Read More »

बनावट गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; एक जण अटकेत, दोघांचा शोध सुरू

  बंगळूर : दहावी (एसएसएलसी), बारावी (पीयूसी) आणि पदवी अभ्यासक्रमांच्या बनावट गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात राजा रेड्डी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून फरार असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरमंगल परिसरात …

Read More »