Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगांव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो. यांच्यातर्फे 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धा ओम नगर शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आल्या. ह्या स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अशोक घागवे व कल्लाप्पा शहापूरकर उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते …

Read More »

अर्धवट कामासह विकास कामांच्या मागणीचे राजेंद्र वडर यांचे मंत्री जारकीहोळी यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर सतीश जारकीहोळी यांची भोज जिल्हा पंचायतचे माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. यावेळी निपाणी तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन वडर यांनी जारकीहोळी यांना दिले. यमकनमर्डी येथील मंत्री …

Read More »

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे, उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या हुन्नरगी शाखा अध्यक्षपदी वसंत शिंत्रे तर उपाध्यक्षपदी अशोक मुरदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेटी सर व संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर …

Read More »

कोट्यवधी रुपयांच्या ठेवी फसवणूक प्रकरण; शिवानंद निलण्णावर यांना सशर्त जामीन

  बेळगाव : शिवम असोसिएट्सच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या ठेवी फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि संस्थेचे मालक शिवानंद निलण्णावर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मिळाला असला तरी प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून त्यांच्यावरील कायदेशीर अडचणी कायम आहेत. या प्रकरणात शिवानंद निलण्णावर यांनी बेकायदेशीरपणे ठेवी गोळा केल्याचा आरोप …

Read More »

मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची निवड

  बेळगाव : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली चार दशके कार्यरत असलेल्या मंथन कल्चरल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव या नामांकित संस्थेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्रीमती प्रिया कवठेकर, उपाध्यक्षपदी श्रीमती अस्मिता आळतेकर, सचिवपदी श्रीमती स्मिता किल्लेकर, सहसचिवपदी श्रीमती सिद्धी …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी

  बेळगाव : सीमाभागातील दिवसेंदिवस वाढत असलेली कन्नडसक्ती रोखण्यासाठी व मराठी भाषिकांचे भाषिक अल्पसंख्यांक हक्क मिळवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार व या मोर्चाचे नियोजन व जनजागृती करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक १४ रोजी दुपारी …

Read More »

कुद्रेमनीत 20 लाखांच्या सी.सी. रस्त्याच्या कामाचे पूजन संपन्न

  मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या फंडातून 150 मीटर रस्ता मंजूर कुद्रेमनी : बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार व महिला आणि बाल विकास, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुद्रेमनी गावातील नाईकवाडी ते बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील 150 मीटर लांबीचा सी. सी. रस्त्याच्या …

Read More »

डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार

  खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जटगे येथील शेतकरी राजाराम रामचंद्र पाटील यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम पाटील हे आपल्या बैलासह डिगेगाळी परिसरातील शिवारात …

Read More »

मृत्यूचे स्मरण जितके प्रभावी तितके पापाचे विस्मरण अधिक दृढ : आचार्य राजरक्षितसूरीजी

  बेळगाव : श्री संभवनाथ जिनालय जैन संघ, बेळगाव येथे आचार्य राजरक्षित सुरजी महाराज यांचे प्रवचन झाले. आपल्या प्रदर्शनात महाराजांनी सांगितले की, “सूर्योदयाची वेळ निश्चित असते. सूर्यास्त कधी होणार हे आपल्याला माहित असते. रेल्वे स्थानकावर गाडी येण्याची आणि जाण्याची वेळ ठरलेली असते. फुले कोमेजण्याची आणि दूध फाटण्याची वेळही निश्चित असते. …

Read More »

अक्कोळ मराठी मुलींच्या शाळेत चव्हाण परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील मराठी मुलींच्या शाळेत निपाणीतील उद्योजक किशोर आणि स्नेहा चव्हाण परिवारातर्फे १२० विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात. याशिवाय मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थिनींना ३० पॅड आणि कंपासाचे वितरण करण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून चव्हाण परिवारातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना …

Read More »