Sunday , September 20 2026
Breaking News

प्लॅस्टिक, ताडपत्रीची निपाणी खरेदी-विक्री

Spread the love

 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली : शेतकऱ्यांचीही लगबग सुरू

निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला प्रारंभ झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारात प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रांची दुकाने सजली आहेत. पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यासह मेंढपाळ बांधवाकडून ताडपत्री, प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी येथील बाजारपेठेमधील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे प्लास्टिक कागद आणि ताडपत्रीच्या दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
शहर आणि ग्रामीण भागात आठवडाभरात मान्सूनच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे उत्पादन झालेले शेतीमालाचे पावसापासून नुकसान थांबविण्यासाठी, घरांसह, झोपड्यांची गळती थांबविण्यासाठी प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्री मागणीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांनी प्लास्टिक कागद आणि ताडपत्री दुकानांमध्ये आतापासूनच खरेदी सुरू केली आहे.
यंदा परिस्थिती सामान्य असल्याने व्यवसायामध्ये काहीशी वाढ होणार असली तरी वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे दरवाढीचा परिणाम प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रीच्या दरांवर झाला आहे. १०ते १५ टक्के दरांमध्ये वाढ झाली आहे. साधी ताडपत्री, प्लॅस्टिक लॅमिनेशन, पीपी मिक्स लॅमिनेशन, नायलॉन सीड ताडपत्री, ब्लॅक रबर हेवी अशा पाच प्रकारातील ताडपत्री बाजारात विक्रीस आली आहे. ६ बाय ९ ते ६० बाय ६० आकारात ताडपत्री उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे रोल प्लॅस्टिक ४ ते १६ फूट, प्लॅस्टिक १० ते ६० फूट विविध प्रकारचे प्लॅस्टिक कापड विक्री होत आहे. ब्लॅक ताडपत्री आणि लॅमिनेशन ताडपत्री यांना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *