Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

श्री शंकराचार्य मठाच्या विकासात श्रींचे योगदान : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्रीं सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. निडसोसी श्रींनी मठात देवदर्शन घेऊन मठाच्या सन्मानाचा स्विकार केला. मठातर्फे श्री शंकराचार्य स्वामीजींच्या हस्ते निडसोसी श्रींचा आणि कंपली श्री विद्या नारायण भारती स्वामीजींचा सन्मान करण्यात …

Read More »

पालिकेत सदस्यांपेक्षा ईटी वरचढ

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी उपनगराध्यक्ष अजित करजगी सभापती सुनिल पर्वतराव आणि सर्व २८ सदस्यांनी पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपये आकारणेचा मांडलेला ठराव मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी धुडकावून लावलेला दिसत आहे. पालिका २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लोकांची लुबाडणूक करीत असल्याचे दिसून येताच सर्व २८ …

Read More »

प्रभाग क्रमांक ४ मध्ये रस्ता नाही, गटार नाही अन् पथदिवे नसल्याची तक्रार

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्या निवारण सभा पार पडली. सभेत उपतहसीलदार आर. एस. बडचीकर मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद कुमार कब्बूरी यांनी प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत अश्विनी क्षिरसागर यांनी पोवार चाळीत गटार नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिले. मठपती प्लाॅटमधील नागरिकांनी आपल्या वसाहतीत …

Read More »

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

  बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बप्पी लाहिरी हे ६९ वर्षांचे होते. मुंबई : 70 च्या दशकात बॉलीवूडला डिस्को आणि रॉक संगीताची ओळख करून देणारे संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा …

Read More »

खानापूर शहराचा विस्तार वाढला तसा कचराही वाढला!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला. लोकवस्ती वाढली. शहराच्या कार्यक्षेत्रात उपनगरे वाढली. त्यामुळे खानापूर शहरात कचरा, पाणी, पथदिप अशा अनेक समस्या खानापूर शहरातील नागरिकांना सतावत आहेत. खानापूर शहरातील मुख्यत्वे करुन कचरा प्रश्न मोठा गंभीर आहे. याला जबाबदार मुख्य खानापूर शहरवासीच आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे …

Read More »

खानापूर शहरातील पॅचवर्क म्हणजे निकृष्ट दर्जाचा नमुना

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत असते. कधी गटारीची समस्या, तर कधी पथदिपाची समस्या, कधी पाण्याची समस्या अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशांना सतावत आहेत. नुकताच खानापूर शहरातील पणजी-बेळगांव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे. खानापूर शहरातील फिश मार्केटपासून ते हलकर्णी गावच्या …

Read More »

आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त युवा समितीच्यावतीने अभिवादन!

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील अंजनी गावामधील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या ‘निर्मळ स्थळ’ या स्मृतीस्थळी भेट देऊन आबांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले यावेळी आबांचे सुपुत्र व तासगावचे युवा नेते …

Read More »

हुंचेनहट्टी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

बेळगाव : हुंचेनहट्टी (ता. जि. बेळगाव) येथील श्री संत सांप्रदायिक वारकरी एकता संघातर्फे या महिन्याअखेर आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. हुंचेनहट्टी येथील मराठी कन्नड प्राथमिक शाळेच्या मैदानावर येत्या दि. 26 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात …

Read More »

भविष्यात चांगल्या वक्त्यांसाठी स्पर्धा प्रेरणादायी

वैशाली पाटील : कुर्लीतील वक्तृत्व स्पर्धेत शिरोळची ’शांभवी’प्रथम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी गेली 13 वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. भविष्यात चांगले वक्ते निर्माण करण्यासाठी आशा स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतात, असे मत मुंबई येथील वैशाली पाटील यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील …

Read More »

माध्यमिक विद्यालय कर्ले येथे पालक मेळावा संपन्न

बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय कर्ले ता. बेळगाव येथे दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पालक, शिक्षक, विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किणये ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक रावजी पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी …

Read More »