बेळगाव : बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात काल गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक आरती केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून स्वामी समर्थांच्या …
Read More »सौंदत्ती रेणुका देवी मंदिराच्या दानपेटीत तीन कोटी ८१ लाख जमा
बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली असून, एप्रिल ते जून येथील महिन्याच्या कालावधीत देणगी स्वरूपात ३ कोटी ८१ लाख रुपये देणगी जमा झाली आहे. सलग दोन दिवस देणगीची मोजदाद करण्यात आली. मंदिराला देणगीच्या स्वरूपात ३ कोटी ३९ लाख ४० हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. यांसह …
Read More »आषाढी दिंडीसह चव्हाट गल्ली 5 नंबर मराठी शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
बेळगाव : आज दिनांक 10 जुलै रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा नं. 5 आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला सर्व पालक आणि विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गल्लीमध्ये आषाढी …
Read More »फेमा प्रकरणात कर्नाटकातील काँग्रेस आमदारावर ईडीचे छापे
बंगळूर : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्रकरणांच्या संदर्भात कर्नाटकातील काँग्रेस आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अचानक छापे टाकले. सूत्रांनी सांगितले की, बंगळुरमधील किमान पाच परिसरांची झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील काँग्रेस आमदार सुब्बारेड्डी यांच्या घरांचाही समावेश आहे. सूत्रांनी …
Read More »पाच वर्षे राज्याचा मीच मुख्यमंत्री; सिद्धरामय्या यांनी केला पुनरूच्चार
बंगळूर : राज्यात मुख्यमंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे सत्तेच्या वाटपाचा मुद्दा हायकमांडसमोर उपस्थित झालेला नाही. मी ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणार, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत गुरुवारी बोलताना पुनरूच्चार केला. कर्नाटक राज्याच्या राजकारणातील नेतृत्व बदलाबाबत काही आमदारांच्या विविध व्याख्या आणि जाहीर विधानांमध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व अटकळांना खोडून …
Read More »सीमाभागात पुन्हा कन्नडसक्तीचा वरवंटा; भाषिक अल्पसंख्यांक कायद्याची पायमल्ली!
“कन्नड अंमलबजावणी प्रगती आढावा” बैठक बेळगाव : घटनात्मक हक्क आणि भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे उल्लंघन करत सीमाभागात जाणीवपूर्वक कन्नडसक्तीच्या नावाखाली मराठी भाषिकांची पिळवणूक करण्याचे काम कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. मागील 68 वर्षापासून कन्नड सक्तीच्या बडग्याखाली सीमाभाग भरडला जात असून सर्वोच्च न्यायालय, भाषिक अल्पसंख्यांक कायदा, विविध केंद्रीय समित्यांच्या सूचना व आदेशाला …
Read More »“बेळगाव वार्ता”चा इम्पॅक्ट! आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप दुरुस्त
बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव तसेच वडगाव स्मशानभूमी रस्ता येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रकाशित केली होती. या बातमीची तात्काळ इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट कंट्रोल रूमने दखल घेत पथदीप दुरुस्त केले. आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद होते. स्थानिक …
Read More »जोशीज पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी
बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ब्रह्माकुमारी अनिता यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून सर्वांनी गुरूंचा आदर नेहमी राखावा असे …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी….
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या गीताने झाली. त्यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर, प्रमुख अतिथी निता यल्लारी याच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना …
Read More »एकीकरण युवा समिती निपाणी यांच्यावतीने भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक साहित्य वाटप अंतर्गत निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व मुलींची शाळा भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतेवेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती विषयी तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta