राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी …
Read More »नामदेव मंदिरात एकादशी साजरी
निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११) द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, …
Read More »…तर पालिकेसमोर कचरा टाकू : नगरसेविका वाणी जोशी यांचा इशारा
बेळगाव : कुंदानगरी बेळगावात कचरा विल्हेवाटीची समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. खुद्द नगरसेवकांनीच मनपाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.होय, महापालिकेच्या प्रभागातील कचरा उचलण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. दर चार दिवसांनी घरोघरी कचरा नेणे टाळावे आणि तो दररोज किंवा दुसऱ्या दिवशी उचलावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. पण …
Read More »पंढरपूर अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार; दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चमध्ये अंत्यविधी
बेळगाव : पंढरपूरला जाताना रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेले बेळगावचे फ्रीलान्स छायाचित्रकार राजू शिंदोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानात दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. राजू संभाजी शिंदोळकर आणि परशुराम संभाजी झंगरुचे हे शनिवारी सायंकाळी एकादशी निमित विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी कारमधून बेळगावहून निघाले असताना पंढरपूर-सांगोला मार्गावर कासेगाव फाट्यावर कार उलटून …
Read More »बेळगाव जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही : मंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात होणार पाऊस हा बहुतांशी लोकांना त्रासदायक ठरतो. मात्र जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला …
Read More »जयललितांच्या पक्षात ‘युद्ध’ : पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी, ईपी पलानीस्वामी नवीन ‘बॉस’
चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्ष अण्णाद्रमुकमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुहेरी नेतृत्व मॉडेलला संपवून, ईपीएस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईके पलानीस्वामी यांची आज (दि. 11) पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते ओ पनीरसेल्वम यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्यात आली आहे. अण्णाद्रमुकमधील वर्चस्वाच्या लढाईत माजी …
Read More »“धनुष्यबाणा”साठी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगकडे धाव
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव घेत कॅव्हेट दाखल केलं आहे. भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची …
Read More »खानापूर आम आदमीच्यावतीने कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील याच्यावतीने कणकुंबी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी उपस्थित होते. बक्षिसाचे वितरक म्हणून खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी …
Read More »कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा; कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही: दीपक केसरकर
मुंबई: आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta